भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या अतिशय वाईट फॉर्मशी झगडत आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्यात त्याला सातत्याने अपयश आले आहे. त्यामुळे अनेक माजी खेळाडूंनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्याला टी २० विश्वचषकामध्ये संधी देऊ नये, असेही काहींचे म्हणणे आहे. या सर्व नकारात्मक वातावरणामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज ब्रेट लीने विराट कोहलीशी संबंधित काही आठवणींना उजाळा आहे. विराट कोहली अतिशय चांगल्या व्यक्तीमत्त्वाचा खेळाडू असल्याचे ब्रेट ली म्हणाला आहे.

ब्रेट लीचे स्वत:चे एक युट्युब चॅनेल आहे. त्यावरती तो क्रिकेटशी संबधित विविध व्हिडीओ अपलोड करत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने विराट कोहलीशी संबंधित आठवणींना उजाळा देणारा एक व्हिडीओ तयार करून अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने आपला मुलगा प्रिस्टन ली आणि विराट कोहली यांच्याबद्दल माहिती दिली आहे.

हेही वाचा – IND vs ENG : ड्रेसिंग रूमकडे न जाता दुसरीकडेच वळाली रोहित शर्माची पाऊले!

ब्रेटने आपल्या आयुष्यातील एका खास क्षणाचा खुलासा केला आहे. “भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यादरम्यान मी मैदानाच्या बाजूला समालोचन करत होता. तेव्हा मी कोहलीला सांगितले होते की माझा मुलगा प्रिस्टन त्याचा चाहता आहे. हे ऐकल्यानंतर विराटने कसोटी सामना संपल्यानंतर प्रिस्टनसाठी आपला शर्ट भेट म्हणून दिला होता. विशेष म्हणजे त्याने त्या टेस्ट शर्टवरती प्रिस्टनसाठी खास संदेशही लिहिला होता. आजही प्रिस्टन विराट कोहलीचा तो शर्ट जीवापाड जपतो,” असे ब्रेटलीने सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट कोहली गेल्या काही काळापासून चांगली खेळी करू शकलेला नाही. एजबस्टन कसोटीत त्याने दोन डावात केवळ ३१ धावा केल्या. त्यानंतर झालेल्या दोन टी २० सामन्यांमध्येही त्याला १२ धावा करता आल्या. याशिवाय, मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामनाही खेळता आलेला नाही.