Bumrah broke Shami’s record by taking five wickets : केपटाऊन कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात मोहम्मद सिराजने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार गोलंदाजी करत एकूण सहा विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने दमदार कामगिरी करत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. या पराक्रमाच्या जोरावर बुमराहने अनेक विक्रमाची रांग लावली. त्याचबरोबर जवागल श्रीनाथ यांच्या एका मोठा विक्रमाशी बरोबरी केली आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहने एकूण आठ खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला.

या सामन्यात बुमराहने १३.५ षटकात ६१ धावा देत सहा विकेट्स, घेतल्या. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर ही तिसरी वेळ होती जेव्हा बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात पा विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्याने जवागल श्रीनाथच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याचबरोबर आणि मोहम्मद शमी, श्रीसंत आणि व्यंकटेश प्रसाद यांचा विक्रम मोडला. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा डाव १७६ धावांवर आटोपला.

Mohit Sharma Unwanted Record
DC vs GT : ऋषभने धुलाई करताच, मोहित शर्मा ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकणारा गोलंदाज
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Updates in Marathi
DC vs KKR : केकेआरने रचला इतिहास! सुनील नरेनच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीसमोर ठेवले २७३ धावांचे लक्ष्य

बुमराहने शमी, श्रीसंत आणि व्यंकटेश प्रसादचा विक्रम मोडला –

जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉर्मेटमध्ये तिसऱ्यांदा अशी कामगिरी केली. पाच विकेट्स घेताच त्याने जवागल श्रीनाथची बरोबरी केली. श्रीनाथने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये तीनदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला.

हेही वाचा – IND vs SA 2nd Test : विराट कोहलीच्या ‘या’ कृतीवर संतापला एडन मार्करम, थेट पंचांकडे तक्रार करताना दिसला, पाहा VIDEO

बुमराहने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, माजी वेगवान गोलंदाज श्रीसंत आणि व्यंकटेश प्रसाद यांना मागे टाकत दक्षिण आफ्रिकेतील कसोटीत तिसऱ्यांदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. या तिन्ही फलंदाजांनी त्यांच्या भूमीवर प्रोटीज विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकी दोनदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. आता, दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटीत सर्वाधिक पाच विकेट्स घेणार्‍या भारतीय गोलंदाजांमध्ये बुमराह श्रीनाथसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

भारताकडून दक्षिण आफ्रिकेत एका डावात सर्वाधिक ५ विकेट्स घेणारे गोलंदाज (कसोटीमध्ये) –

३ -जसप्रीत बुमराह
३ – जवागल श्रीनाथ
२- मोहम्मद शमी
२ – एस श्रीसंत
२ – व्यंकटेश प्रसाद

न्यूलँड्स येथे कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –

२५ – कॉलिन ब्लिथ (इंग्लंड)
१८ – जसप्रीत बुमराह (भारत)
१७ – शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
१६ – जेम्स अँडरसन (इंग्लंड)
१५ – जॉनी ब्रिग्ज (इंग्लंड)

हेही वाचा – IND vs SA 2nd Test : ‘न्यूलँड्सची अशी खेळपट्टी याआधी कधीच…’, पहिल्या दिवसानंतर आफ्रिकेच्या फलंदाजी सल्लागाराची प्रतिक्रिया

दक्षिण आफ्रिकेत कसोटी क्रिकेमटध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज –

४५ – अनिल कुंबळे
४३ – जवागल श्रीनाथ
३८* – जसप्रीत बुमराह
३५ – मोहम्मद शमी
३० – झहीर खान