scorecardresearch

Premium

‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटूंचं जोडलं गेलं बॉलिवूड अभिनेत्रींशी नाव

सध्या काही क्रिकेटपटूंच्या बॉलिवूड अभिनेत्रींशी अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगत आहेत

‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटूंचं जोडलं गेलं बॉलिवूड अभिनेत्रींशी नाव

भारतात क्रिकेटपटूंना कायम प्रेम आणि आदर मिळतो. टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंना सेलिब्रिटीजसारखी वागणूक मिळते आणि त्यांच्या कामगिरीचीदेखील वाहवा केली जाते. या गोष्टींमुळे क्रिकेटपटूंना लोकप्रियता मिळतेच, पण काहींना या लोकप्रियतेचा तोटादेखील होतो. चाहत्यांना क्रिकेटपटूंचे खासगी आयुष्य जाणून घेण्यात खूप रस असतो. त्यामुळे क्रिकेटपटूंच्या खासगी आयुष्यातील गोष्टींच्या चर्चाही सार्वजनिकपणे केल्या जातात. प्रसारमाध्यमांमध्येही या चर्चा चांगल्याच चघळल्या जातात. सध्या काही क्रिकेटपटूंच्या बॉलिवूड अभिनेत्रीशी अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगत आहेत. जाणून घेऊ या त्यातील काही अफेअर्सच्या चर्चा –

हार्दिक पांड्या – उर्वशी रौतेला</strong>

भारताचा धमाकेदार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा मैदानावरील खेळासाठी कायम चर्चेत असतो. तर मैदानाबाहेर तो आपली हेअरस्टाईल, कपडे आणि अॅक्सेसरिज यासारख्या गोष्टींमुळे चर्चेत असतो. त्याच्या याच स्टाईलमुळे अनेक मुली त्याच्यावर फिदा असल्याचे कबूलही करतात. मात्र हार्दिक पांड्या मात्र एका बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करण्याच्या मुद्द्यावरून चर्चेत आला होता. तसे हार्दिकचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. आधी एली अवराम आणि त्यानंतर उर्वशी रौतेला या अभिनेत्रींशी त्याचे अफेअर असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. हार्दिक आणि उर्वशी या दोघांनीही या चर्चा केवळ अफवा असल्याचे सांगितले असले तरी हे दोघे अजूनही बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसतात. उर्वशीने या अफेअरच्या चर्चांवरून एकदा प्रसारमाध्यामाच्या प्रतिनिधींनाही झापले होते. पण हार्दिकने मात्र या चर्चांवर बोलणे टाळले आहे.

के एल राहूल – अथिया शेट्टी</strong>

भारताचा सलामीवीर लोकेश राहूल हा सध्या अलिया भटची मैत्रिण असलेल्या मुलीला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण त्याआधी तो बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी हिला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या दोघांना अनेक ठिकाणी एकत्र आऊटींग करताना पाहिले आहे. आथिया ही अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी आहे. तिने हिरो या चित्रपटातून पदार्पण केले होते. गेल्या वर्षाच्या अखेरीपासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. पण हे दोघांनी मात्र या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

जसप्रीत बुमराह – अनुपमा परमेश्वरन

भारताच्या वेगवान गोलंदाजीचा कणा मानला जाणारा जसप्रीत बुमराह सध्या अप्रतिम लयीत आहे. मैदानावर तो भल्याभल्या गोलंदाजांचे त्रिफळे उडवतो, पण खऱ्या आयुष्यात मात्र एका दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीने त्याची ‘विकेट’ काढल्याची चर्चा आहे. अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिला बुमराह डेट करत असल्याचे बोलले जात आहे. हे दोघे सोशल मिडीयावर एकमेकांना फॉलो करत असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. अनुपमाने या नात्याला केवळ मैत्री असल्याचे म्हटले आहे. पण प्रसारमाध्यमांमध्ये मात्र त्यांच्या अफेअरच्या चर्चा अजूनही सुरूच आहेत.

युझवेंद्र चहल – तनिष्का कपूर

भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल हा सध्या उत्तम कामगिरी करत आहे. त्याच्या कामगिरीमुळे भारताला गेल्या काही वर्षात निर्धारित षटकांच्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करता आली. भल्याभल्या फलंदाजांना त्याने फिरकीच्या जाळ्यात ओढले. पण सध्या तो एका अभिनेत्रीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकल्याच्या चर्चा आहेत. कन्नड अभिनेत्री तनिष्का कपूर हिच्याशी युझवेंद्र चहलचे अफेअर असल्याच्या चर्चा आहेत. गेल्या काही दिवसात या चर्चांना उधाण आले आहे. यावर अभिनेत्री तनिष्काकडून काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही, पण युझवेंद्रने मात्र ‘आमच्यात केवळ मैत्री आहे’ असे स्पष्ट केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Celebrity cricketers bollywood actresses love affairs gossips vjb

First published on: 25-08-2019 at 13:01 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×