Champions Trophy 2017 Final IND vs PAK: चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ हा पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासातील असाच एक अध्याय आहे, ज्याची इतिहासात कायमची नोंद झाली आहे. अंतिम सामन्यात सरफराज अहमदच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघाने भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले. यानंतर सरफराज अहमद पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय नायक बनला. बरं सहा वर्षांनंतर परिस्थिती खूप बदलली आहे. आता पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या फायनलबद्दल एक वक्तव्य केले आहे.
बाबर आझम आता तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचा कर्णधार आहे, सरफराज अहमद मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमधून बाहेर झाला आहे. त्याने मोठ्या मुश्किलीने कसोटी संघात पुनरागमन केले आहे. त्यानंतर सरफराज अहमदने नादिर अलीच्या पॉडकास्टवर चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ फायनल सामन्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
भारताविरुद्धच्या विजयाचे वर्णन शब्दात करता येणार नाही –
नादिर अली पॉडकास्टवर सरफराज अहमद चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलबद्दल म्हणाला, “चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना कधीही विसरता येणार नाही. भारताविरुद्धच्या फायनलमधील विजयाचे वर्णन शब्दात करता येणार नाही. हा सामान्य सामना असता तर एवढी मोठी गोष्ट झाली नसती, याआधीही आम्ही भारताविरुद्ध सामने जिंकले आहेत. आयसीसी स्पर्धांमध्ये तसेच द्विपक्षीय मालिकांमध्ये. वस्तुस्थिती अशी आहे की, आम्ही बरेच सामने जिंकले आहेत. पण कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग करू शकणाऱ्या संघाविरुद्धचा सामना जिंकणे अविश्वसनीय होते.”
हेही वाचा – IPL 2023 CSK vs GT: एमएस धोनी पहिल्या सामन्यात खेळणार नाही? मग कोण सांभाळणार सीएकेचे धुरा, जाणून घ्या
भारतासाठी कोणतेही लक्ष्य पुरेसे नसते –
सरफराज अहमद पुढे म्हणाला, “भारतासाठी कोणतेही लक्ष्य पुरेसे नसते, त्यांच्याकडे रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीसारखे खेळाडू होते. तेव्हा आमच्या खेळाडूंचे दुधाचे दातही तुटलेले नव्हते. आमच्याकडे अशी मुले होती जी पाकिस्तानला मोठ्या उंचीवर नेत आहेत. बाबर आझम, हसन अली, शादाब खान आणि फहीम अश्रफ हे सर्व तरुण खेळाडू त्यावेळी होते.”