आयपीएल २०२१ स्पर्धेत कोलकाता विरुद्ध चेन्नई यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात कोलकात्याचा कर्णधार मॉर्नगनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शुबमन गिल बाद झाल्यानंतर संघावर दडपण आलं. अंबाती रायडूने जबरदस्त क्षेत्ररक्षण करत त्याला धावचीत केलं. शुबमन गिलने ५ चेंडूत ९ धावा केल्या. यात २ चौकारांचा समावेश आहे. शुबमन गिलनंतर वेंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांनी संघाचा डाव सावरला. मात्र संघाची धावसंख्या ५० असताना वेंकटेश अय्यर बाद झाला. त्याने १५ चेंडूत १८ धावा केल्या. यात ३ चौकारांचा समावेश आहे. शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने त्याचा झेल घेतला. कर्णधार इऑन मॉर्गनही खेळपट्टीवर जास्त वेळ तग धरू शकला नाही. १४ चेंडूत ८ धावा करून तंबूत परतला.

इऑन मॉर्गननं जोश हेझलवुडच्या गोलंदाजीवर उंच फटका मारला. हा चेंडू सीमापलीकडे जाईल असा अंदाज होता. मात्र फाफ डुप्लेसिसनं सीमेवर अप्रतिम झेल पकडला आणि मॉर्गनला तंबूचा रस्ता दाखवला.

चेन्नई- एमएस धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना, अंबाती रायडू, मोइन अली, रविंद्र जडेजा, सॅम करेन, फाफ डुप्लेसिस, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, जोश हेजलवूड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोलकाता- इऑन मॉर्गन (कर्णधार), शुबमन गिल, वेंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, सुनील नरेन, लॉकी फर्ग्यूसन, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती