scorecardresearch

IND vs AUS 3rd Test: टीम इंडियाच्या पराभवानंतर पुजाराने जिंकली मने; एक षटकार ठरला लाखमोलाचा, पाहा VIDEO

Cheteshwar Pujara Sixer Video: टीम इंडियाचा स्टार कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये ७१००० हून अधिक धावा केल्या आहेत. मात्र यादरम्यान केवळ १६ षटकार मारले आहेत. इंदोरमध्ये षटकार मारण्यासाठी त्याला एक लाख रुपये मिळाले.

Cheteshwar Pujara Sixer Video
चेतेशेवर पुजारा (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

India vs Australia 3rd Test: टीम इंडियाला तिसऱ्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला असेल. पण भारतीय संघाचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने तिसऱ्या कसोटीत सर्वांची मने जिंकली. ज्या सामन्यात एकही भारतीय फलंदाज अर्धशतक झळाकावू शकला नाही. त्या सामन्यात पुजाराने ५९ धावांची खेळी खेळून आपले कौशल्य दाखवले. विशेष म्हणजे पुजाराला इंदोर कसोटीसाठी असा पुरस्कार मिळाला आहे, ज्याचा त्याने स्वतः विचारही केला नसेल.

चेतेश्वरच्या बॅटमधून निघाला ७९ मीटरचा षटकार –

चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या डावात ५९ धावांची खेळी केली, ज्यामध्ये त्याने ५ चौकार आणि १ जबरदस्त षटकार मारला. विशेष बाब म्हणजे पुजाराने १०० हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत, मात्र त्याच्या कारकिर्दीतील हा १६वा षटकार होता. ज्यासाठी त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस मिळाला आहे. कारण पुजाराचा हा षटकार ७९ मीटर लांब होता. पुजाराने दुस-या डावात संघाला चांगली धावसंख्या गाठण्यास मदत केली. मात्र इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही.

वास्तविक सामन्याच्या सादरीकरणात, अंबुजा स्ट्राँगेस्ट परफॉर्मर ऑफ द मॅच पुजाराची निवड करण्यात आली. त्याला या सामन्यातील सर्वात लांब षटकार मारण्यासाठी हा पुरस्कार मिळाला. पुरस्काराची घोषणा करणाऱ्या मुरली कार्तिकनेही पुजाराला बोलावले. त्यानंतर तो म्हणला पुजारा हा पुरस्कार निश्चितच दीर्घकाळ लक्षात ठेवेल. पुजाराने दुसऱ्या डावात १४२ चेंडूत ५९ धावा केल्या, ज्यात पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

हेही वाचा – IND vs AUS: रोहित शर्माच्या नावावर झाली लाजिरवाण्या विक्रमाची नोंद; ७१ वर्षांपूर्वीच्या ‘या’ सामन्याची झाली आठवण

या षटकारामागे ही एक मजेदार कथा आहे. खरे तर, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताकडून अक्षर पटेल आणि चेतेश्वर पुजारा फलंदाजी करत होते. तेव्हा ड्रेसिंग रूममधून कर्णधार रोहित शर्माने या दोघांना इशान किशनच्या माध्यमातून संदेश पाठवला. ज्यामध्ये सांगितले होते, की बचावात्क न खेळता आक्रमक खेळावे. त्यानंतर लगेचच हा षटकार पुजाराच्या बॅटमधून आला. जे पाहून कर्णधार रोहितचा चेहऱ्यावर हास्य फुलले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 18:29 IST