scorecardresearch

IND vs AUS: रोहित शर्माच्या नावावर झाली लाजिरवाण्या विक्रमाची नोंद; ७१ वर्षांपूर्वीच्या ‘या’ सामन्याची झाली आठवण

IND vs AUS 3rd Test: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा तिसऱ्या कसोटी सामन्यात ९ विकेट्सनी पराभव झाला.ज्यामुळे रोहित शर्माच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली.

IND vs AUS 3rd Test rohit sharma embarrassing record in test
रोहित शर्मा (फोटो-ट्विटर)

India vs Australia 3rd Test: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळवला, मात्र तिसऱ्या कसोटी सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातील पराभवासह भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपल्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला. रोहित शर्मा आता घरच्या मैदानावर सर्वात कमी चेंडूंमध्ये सामना गमावणारा भारताचा पहिला कसोटी कर्णधार ठरला आहे.

इंदोरमध्ये ऑस्ट्रेलियाकडून ९ गडी राखून पराभूत झाल्यानंतर रोहित शर्माने भारतीय कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये खराब विक्रम केला. खरं तर, रोहित शर्मा हा भारताचा पहिला कसोटी कर्णधार ठरला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ घरच्या मैदानावर सर्वात कमी चेंडूंमध्ये सामना हरला. या सामन्यात एकूण ११३५ चेंडू टाकण्यात आले. ज्यामध्ये विजय-पराजय निश्चित झाला.

दुसरीकडे, ७१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९५१-५२ मध्ये विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली भारताने कानपूरमध्ये इंग्लंडविरुद्ध सामना गमावला होता. हा सामना भारतीय संघाने अगदी कमी चेंडूंमध्ये हरला होता. त्या सामन्यात एकूण १४५९ चेंडू टाकले होते. त्या सामन्यात टीम इंडियाचा इंग्लंडकडून ८ विकेट्सने पराभव झाला होता.

हेही वाचा – IND vs AUS 3rd Test: पराभवानंतर सुनील गावसकरांनी भारतीय फलंदाजांचे टोचले कान; म्हणाले, ‘तुम्ही खेळपट्टीला…’

मायदेशातील सर्वात लहान कसोटी सामन्यात भारताचा पराभव –

११३५ चेंडू – ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत – इंदोर (२०२२-२३)
१४५९ चेंडू – इंग्लंड विरुद्ध भारत – कानपूर (१९५१-५२)
१४७४ चेंडू – वेस्ट इंडिज विरुद्ध भारत – कोलकाता (१९८३-८४)
१४७६ चेंडू – ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत – मुंबई (२०००-०१)

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाला अवघ्या तीन दिवसांत घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्याची घटना सहाव्यांदा घडली आहे. १९५१ मध्ये कानपूर येथे इंग्लंडविरुद्ध भारताचा पहिल्यांदा पराभव झाला होता. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९९९, २०००, २००७, २०१७ आणि आता २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला आहे.

हेही वाचा – IND vs AUS: टीम इंडियाला पराभूत करत स्टीव्ह स्मिथने रचला इतिहास; २०१० नंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरला दुसरा कर्णधार

त्याचबरोबर गेल्या १० वर्षात भारतीय संघाचा घरच्या मैदानावर झालेला हा तिसरा पराभव आहे. यापूर्वी २०१७ मध्ये स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियन संघाने पुण्यात पराभव केला होता, तर २०२१ मध्ये चेन्नई कसोटीत जो रूटच्या इंग्लिश संघाने भारताविरुद्ध विजय मिळवला होता.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 17:20 IST
ताज्या बातम्या