Ajinkya Rahane withdraws from Leicestershire: अजिंक्य रहाणे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. या काममगिरीच्या जोरावर लीसेस्टरशायने आपल्या संघात समावेश केला होता. त्यामुळे अजिंक्य रहाणे रॉयल लंडन वनडे चषकात खेळणार होता, पण कामाचा ताण कमी करण्यासाठी त्याने ब्रेक घेतला आहे. म्हणून तो या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. याबाबत लीसेस्टरशायरचे क्रिकेट संचालक क्लॉड हेंडरसन यांनी माहिती दिली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अजिंक्य रहाणेला केंद्रीय कराराची ऑफर न दिल्याने लीसेस्टरशायरने त्याला करारबद्ध केले होते. यानंतर अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपली, असे वाटत होते. परंतु, इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता.

आता अजिंक्य रहाणे कसोटी फॉरमॅटमध्ये भारतीय संघाकडून सातत्याने खेळताना दिसणार असल्याचे दिसते आणि याच कारणामुळे त्याने लीसेस्टरशायर संघातून माघार घेण्याचे मन बनवले आहे. लीसेस्टरशायरचे क्रिकेट संचालक क्लॉड हेंडरसन म्हणाले की, क्लबला अजिंक्य रहाणेचा निर्णय पूर्णपणे समजला आहे आणि आता त्याच्या अनुपस्थितीत पीटर हँड्सकॉम्बला संघात सामील केले जाईल.

हेही वाचा – IND vs WI 2nd ODI: शुबमन गिलने रचला इतिहास! बाबर आझमला मागे टाकत केला ‘हा’ खास पराक्रम

अजिंक्य रहाणेचा निर्णय आम्हाला पूर्णपणे समजतो – क्लॉड हेंडरसन

ईएसपीएन क्रिकइंन्फोच्या माहितीनुसार, लीसेस्टरशायरचे क्रिकेट संचालक म्हणाले, ‘आम्ही अजिंक्य रहाणेची परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेत आहोत. गेल्या काही दिवसांपासून त्याचे वेळापत्रक खूप तणावाचे होते. केवळ भारतातच नाही, तर राष्ट्रीय संघ जिथे जिथे दौऱ्यावर गेला आहे, तिथे अजिंक्य रहाणेही गेला आहे. आम्ही त्याच्याशी सतत संवाद साधत असतो आणि क्रिकेटमधील परिस्थिती लवकर कशी बदलते हे आम्ही जाणून आहोत. आम्ही त्याची भावना समजतो आणि प्रार्थना करतो की तो एकदा लीसेस्टरशायरकडून खेळेल.’

हेही वाचा – KPL 2023: ६,६,६,६,६,६,६…सेदिकुल्लाह अटलचा कहर! एकाच षटकात कुटल्या ४८ धावा, पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते पुढे म्हणाले, ‘चांगली गोष्ट म्हणजे अशा परिस्थितीसाठी आम्ही आधीच नियोजन केले होते. त्यामुळे पीटर हँड्सकॉम्ब आमच्या संघात सामील झाल्याचा आम्हाला आनंद आहे. तो खरोखरच खूप चांगला फलंदाज आणि यष्टिरक्षक आहे. तसेच तो एक चांगला कर्णधारही आहे. यामुळे लुईस हिल आणि बाकीच्या खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये खूप मदत होईल.’