सहाव्या दिवशी नेमबाजपटू हिना सिद्धु आणि पॅरा वेटलिफ्टर सचिन चौधरी यांनी मिळवलेल्या पदकानंतर, भारताने सातव्या दिवशी पुन्हा एकदा आश्वासक कामगिरी केली आहे. डबल ट्रॅप नेमबाजी स्पर्धेत भारताच्या श्रेयसी सिंहने सुवर्णपदकाची कमाई करत भारताच्या खात्यात पहिलं सुवर्णपदक टाकलं. त्याआधी ओम मिथरवालने २५ मी. पिस्तुल शुटींगमध्ये भारताला कांस्यपदकाची कमाई करुन दिली. या स्पर्धेत भारताचा जितू राय लवकर बाहेर पडला. यानंतर ओम मिथरवाल सुवर्णपदकाच्या शर्यतीत होता, मात्र शेवटच्या संधींमध्ये केलेली हाराकिरी ओमला चांगलीच महागात पडली. अखेर ओम तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आणि भारताच्या खात्यात कांस्यपदक पडलं.

यानंतर बॉक्सिंगमध्ये मेरी कोमने अंतिम फेरीत धडक मारत भारताला आणखी एका सुवर्णपदकाची आशा लावून दिली आहे. याव्यतिरीक्त इतर बॉक्सर्सनेही उपांत्य फेरीत धडक मारत कांस्यपदक निश्चीत केलं आहे. यानंतर दुपारच्या सत्रात डबल ट्रॅप नेमबाजीत भारताच्या अंकुर मित्तलने कांस्यपदक पटकावत भारताला आणखी एक पदक मिळवून दिलं.

  • उपांत्य फेरीत भारताची गाठ न्यूझीलंडशी
  • अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय हॉकी संघांची इंग्लंडवर मात, भारत ४ इंग्लंड ३
  • अॅथलेटिक्समध्ये तेजस्वी शंकर, हिमा दास पदकाच्या शर्यतीमधून बाहेर
  • बॉक्सर मनिष कौशिक पुढच्या फेरीत दाखल, भारताचं आणखी एक पदक निश्चीत
  • भारतीय बॅडमिंटनपटूंचीही आश्वासक कामगिरी, सायना, सिंधू, किदम्बी श्रीकांत, प्रणॉय पुढच्या फेरीत
  • टेबल टेनिस – एकेरी स्पर्धेत मधुरिका पाटकरची त्रिनिनाद आणि टोबॅगोच्या प्रतिस्पर्ध्यावर मात
  • ५१ किलो वजनी गटात भारताची बॉक्सर पिंकी राणी उपांत्य पूर्व फेरीतून बाहेर
  • ५२ किलो वजनी गटात भारताचा गौरव सिंह उपांत्य फेरीत दाखल, भारतीय बॉक्सर्सचं पदकतालिकेवर वर्चस्व
  • बॉक्सिंग – विकास कृष्णन पुढच्या उपांत्य फेरीत दाखल, बॉक्सिंगमध्ये भारताला आणखी एक पदक
  • सनिल शेट्टी व मधुरिका पाटकरचीही श्रीलंकन प्रतिस्पर्ध्यावर मात
  • मनिका बत्रा व सत्यन गणशेखरनचीही पुढच्या फेरीत धडक
  • मिश्र दुहेरीत शरथ अचंता कमाल व मौमा दास पुढच्या फेरीत दाखल
  • टेबल टेनिसमध्येही भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी
  • बॅडमिंटन – सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत. पी. व्ही. सिंधू, ऋत्विका गड्डे पुढच्या फेरीत दाखल
  • अंकुर मित्तालच्या खात्यात कांस्यपदक, नेमबाजांची धडाकेबाज कामगिरी सुरुच
  • श्रेयसी पाठोपाठ डबल ट्रॅप पुरुष नेमबाजीत भारताला आणखी एक पदक
  • मोक्याच्या क्षणी आलेल्या दबावामुळे अंकुर तिसऱ्या स्थानावर फेकला गेला
  • भारताच्या अंकुर मित्तलची अखेरच्या फेरीपर्यंत झुंज सुरु
  • एका गुणाच्या फरकाने अशरचं राष्ट्रकुल पदक हुकलं
  • डबल ट्रॅप नेमबाजीत भारताचा अशर मोहमद चौथ्या स्थानावर
  • भारताची वर्षा वर्मन डबल ट्रॅप नेमबाजीत चौथ्या स्थानावर
  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर
  • अटीतटीच्या अंतिम फेरीत शुटऑफमध्ये ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्ध्यावर केली मात
  • डबल ट्रॅप प्रकारात भारताच्या श्रेयसी सिंहला सुवर्णपदक
  • ५२ किलो वजनी गटात भारताचा बॉक्सर गौरव सोळंकी पुढच्या फेरीत दाखल, भारताचं बॉक्सिंमधलं आणखी एक पदक निश्चीत
  • स्क्वॅश – भारताचे विक्रम मल्होत्रा-रमीत टंडन पुढच्या फेरीत
  • बॉक्सर सरिता देवा उपांत्य पूर्वी फेरीमधून बाहेर
  • दुसरीकडे ४८ किलो वजनी गटात भारताची मेरी कोम अंतिम फेरीत
  • ओम मिथरवालला कांस्यपदक, भारताने सुवर्णपदक मिळवण्याची आणखी एक संधी गमावली
  • अखेरच्या क्षणात ओम मिथरवालची हाराकिरी, सुवर्णपदकाच्या शर्यतीत असलेला ओम खाली घसरला
  • जीतू राय ५० मी. पिस्तुल प्रकाराच्या अंतिम फेरीतून बाहेर, भारताचं एक पदक हुकलं
  • भारताच्या पदकांच्या आशा वाढल्या, जीतू-ओमच्या कामगिरीकडे देशाचं लक्ष
  • ५० मी. पिस्तुल प्रकारात भारताचे जीतू राय आणि ओम मिथरवाल अंतिम फेरीत