CoronaVirus Outbreak : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवली जाणारी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका करोना व्हायरसच्या धसक्याने रद्द करण्यात आली. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर करोना संदर्भात खबरदारीचा उपाय म्हणून पुढील दोन्ही सामने रद्द करण्यात आले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ कोलकाता विमानतळावरून दुबईमार्गे स्वदेशी परतला. या सामन्यांच्या कालावधीत म्हणजेच १८ मार्चच्या आधीच भारत भविष्यात लॉकडाउनमध्ये जाणार याची कल्पना आली होती, असे वक्तव्य टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले.

IPL 2020 : “नुसतं शीर्षक नको, पूर्ण बातम्याही वाचत जा”; बेन स्टोक्स चाहत्यावर संतापला…

“रस्ते अगदी सामसूम असणं हे आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक होतं. त्या दिवशी आम्ही आमच्या गाड्यांमधून दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी रस्त्यावर आलो, तेव्हाच अंदाज आला होता की काही तरी मोठं नजीकच्या काळात भारताच्या दिशेने कूच करत आहे. ज्या प्रकारे करोनाचा फैलाव होत होता, त्यावरून धोका ध्यानात आला होता. त्यात भर म्हणून दुसरी वन डे रद्द झाली तेव्हा तर खात्रीच पटली की लॉकडाउन अनिवार्य आहे”, असे शास्त्री यांनी स्पष्ट केले.

CoronaVirus : मृत्युशी झुंजणाऱ्या रूग्णासाठी केदार जाधव ठरला ‘देवदूत’!

“टीम इंडिया जेव्हा न्यूझीलंडमध्ये होते तेव्हाच खेळाडूंना करोनाच्या प्रभावाचा अंदाज आला होता. आम्ही सिंगापूर मार्गे भारतात आलो, तेव्हाच आम्हाला समजलं होतं. आम्ही जेव्हा भारतात परतलो तोच करोना स्क्रीनींगचा पहिला दिवस होता. आम्ही अगदी योग्य वेळी मायदेशात परतलो, असे शास्त्री यांनी नमूद केले.

“भारतातून आला आहात… जरा लांबच राहा”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण आफ्रिकेचा संघ जेव्हा भारतातून मायदेशी परतला, तेव्हा तेथे करोना व्हायरसचा फारसा प्रादुर्भाव झालेला नव्हता. योग्य वेळी घेतलेल्या खबरदारीमुळे आफ्रिकेत हा व्हायरस बळावला नाही. पण भारतात मात्र या व्हायरसने थैमान घातले होते. या रोगाची लागण झालेल्याच्या संपर्कात येणेदेखील धोक्याचे होते. तशातच आफ्रिकेचा संघ आधी धरमशाला नंतर कोलकाता असे करत थेट दुबईमार्गे दक्षिण आफ्रिकेत परतला. भारतात आणि दुबईत या व्हायरसचा चांगलाच फटका बसला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आफ्रिकन क्रिकेटपटूंना काही दिवस सामान्य जनजीवनापासून लांब राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.