CoronaVirus Outbreak : करोना तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास लाखभर लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. तरीदेखील लोक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने अखेर पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा केली.

करोनाचं संकट उद्भवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवड्याभरात दुसऱ्यांदा देशाला संबोधित करत मंगळवारी मोठी घोषणा केली. करोनासारख्या महारोगानं जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवलं आहे. त्या राष्ट्रांकडं अत्याधुनिक साधनं असूनही हा आजार इतक्या वेगानं पसरत आहे की तयारीच करता येत नाही. त्यामुळे मंगळवार रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. त्यानंतर क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबतचा एक खास फोटो त्याची प्रेयसी नताशा स्टॅन्कोविच हिने शेअर केला.

 

View this post on Instagram

 

#stayhomestaysafe #quarantine @hardikpandya93

A post shared by Nataša Stanković (@natasastankovic__) on

नताशा स्टॅन्कोविचने पोस्ट केलेल्या फोटोत दोघेही आपल्या कुत्र्यासोबत बेडवर निवांत पडलेले दिसत आहेत. हा खास फोटो शेअर करताना नताशाने करोनाच्या फटक्यापासून सर्वांनी सुरक्षित राहा असे आवाहनही केले आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून नताशा आणि हार्दिक एकमेकांना डेट करत आहेत. मध्यंतरीच त्यांनी साखरपुडाही उरकला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नताशा ही मुंबईमधील एक सर्बियन अभिनेत्री, मॉडेल आणि नर्तिका आहे. प्रकाश झा दिग्दर्शित ‘सत्याग्रह’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.