२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान अखेरीस संपुष्टात आलं आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी मात केली. २४० धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ २२१ धावांपर्यंत मजल मारु शकला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारताचे दिग्गज फलंदाज झटपट माघारी परतत असताना रविंद्र जाडेजाने अर्धशतकी खेळी करत चांगली झुंज दिली. मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविंद्र जाडेजाने ७७ धावांची खेळी केली. सामना संपल्यानंतर माजी भारतीय खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर जाडेजाचं कौतुक केलं. मात्र हे कौतुक करत असतानाही मांजरेकरांनी आपला खोचकपणा दाखवला.

मांजरेकरांच्या या प्रयत्नावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून, चांगली खेळी करुनही जाडेजाला डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्या मांजरेकरांना ट्रोल करण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी संजय मांजरेकर आणि रविंद्र जाडेजा यांच्यातला वाद चांगलाच रंगला होता. जाडेजासारख्या खेळाडूला मी वन-डे संघात घेणार नाही, तो कसोटी क्रिकेट चांगलं खेळतो असं वक्तव्य मांजरेकर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केलं होतं. याला रविंद्र जाडेजानेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket world cup 2019 sanjay manjrekar tries to troll jadeja after his knock against nz fans thrash him straightly psd
First published on: 10-07-2019 at 20:01 IST