दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या (IND vs SA) तिसऱ्या आणि शेवटचा निर्णायक कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह दक्षिण अफ्रिकेनं ही मालिका २-१ ने जिंकली आहे. मात्र, हा सामना डीआरएस तंत्रावरून झालेल्या वादाने चांगलाच चर्चेत राहिला. अफ्रिकन संघाचे कर्णधार डीन एल्गरला (Dean Elgar) डीआरएसचा वापर केल्यानंतर नॉट आऊट घोषित करण्यात आलं. यावर भारतीय कर्णधार विराट कोहलीसह (Virat Kohli) भारतीय संघाकडून (Indian Cricket Team) नाराजी व्यक्त करण्यात आली. या वादात आपल्या आक्रमकतेमुळे विराट कोहली केंद्रस्थानी राहिला. मात्र, भारताचा एमाजी खेळाडू सबा करीमने विराटच्या या रागावलेल्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे.

“तुम्ही तंत्रज्ञानावर प्रश्न उपस्थित करू शकत नाही”

सबा करीम खेलनीति यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला, “भारतीय खेळाडूंना अशाप्रकारे आपला राग व्यक्त करायला नको होता. वादग्रस्त डीआरएस कॉलनंतर भारतीय संघाच्या एकाग्रतेत घट झाली. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला वेगाने धावा काढणं शक्य झालं.”

Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
Shubman Gill Future India Captain, Suresh Raina Claims
IPL 2024 : हार्दिक किंवा पंत नव्हे, तर ‘हा’ २४ वर्षीय खेळाडू असू शकतो भारताचा भावी कर्णधार, ‘मिस्टर आयपीएल’चे वक्तव्य
Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
Maldives Minister Mariyam Shiuna
मालदीवच्या निलंबित मंत्र्याकडून भारतीय ध्वजाचा अपमान; तीव्र प्रतिक्रिया उमटताच मागितली माफी

“डीआरएस तंत्रज्ञान खेळाडूंना मदतीसाठी समोर आलं आहे. कधी कधी आपल्याला वाटतं खेळाडू बाद आहे, मात्र तुम्ही तंत्रज्ञानासोबत वाद करत बसू शकत नाही. या संपूर्ण घटनेनंतर भारतीय खेळाडूंची एकाग्रता भंग झाली. तेव्हा खरंतर सामन्यावर लक्ष केंद्रित असायला हवं होतं. ब्रॉडकास्टरवर भेदभावाचा आरोप करणं भारतीय संघाला शोभत नाही.”

नेमकं काय झालं होतं?

अफ्रीकेची फलंदाजी सुरू असताना २१ व्या षटकात रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर डीन एल्गर एलबीडब्ल्यू बाद झाला. मात्र, एल्गरने डीआरएस रिव्ह्यू घेतला. यात त्याला नाबाद घोषित करण्यात आलं. डीआरएसमध्ये चेंडू यष्टीच्या वरून जात असल्याचं दाखवण्यात आलं. त्यामुळे हा निर्णय बदलण्यात आला. मात्र, भारतीय कर्णधार विराट कोहलीला या निकालावर विश्वास बसला नाही. त्यामुळे कोहलीसह भारतीय खेळाडूंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा : सेहवाग, युवराज, हरभजनसह ‘हे’ भारतीय खेळाडू पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर खेळणार, कधी-कोठे? वाचा सविस्तर…

असं असलं तरी डीन एल्गर अखेर डीआरएस तंत्राच्या आधारेच बाद झाला. त्याला जसप्रीत बुमराहने बाद केलं. याचा निर्णय डीआरएस तंत्रामुळेच भारताच्या बाजूने लागला.