ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल खेळांच्या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाला आपली लय सापडलेली आहे. साखळी फेरीत आपला तिसरा सामना खेळणाऱ्या भारताने मलेशियावर २-१ अशी मात करत उपांत्य फेरीतला आपला प्रवेश निश्चीत केला आहे. पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात भारताला २-२ अशी बरोबरीत समाधान मानावं लागलं होतं. दुबळ्या वेल्सच्या संघावर भारताने मात केली, मात्र या सामन्यातही भारताला विजयासाठी ४-३ असं झुंजावं लागलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मलेशियाविरुद्धच्या सामन्यात भारताने आपली मरगळ झटकत दमदार पुनरागमन केलं. भारताकडून तरुण ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंहने दोन गोल केले. त्याचे हे गोल सामन्यात निर्णायक ठरले. मलेशियाकडून फैजल सारीने १६ व्या मिनीटाला गोल करत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, पण हरमनप्रीतने त्याच्या या प्रयत्नांना सुरुंग लावला. साखळी फेरीत भारताचा इंग्लंडविरुद्ध सामना अजुन बाकी आहे. उपांत्य फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणं टाळायचं असल्यासं, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cwg 2018 india win 2 1 against malaysia qualify for semis
First published on: 10-04-2018 at 08:27 IST