इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे. उंच उडीमध्ये भारतीय खेळाडूंनी अभूतपूर्व कामगिरी केली आहे. भारताच्या एल्डहोस पॉल आणि अब्दुल्ला अबुबकर यांनी पुरुषांच्या तिहेरी उडीत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यातील हे १६वे सुवर्ण आणि १२वे रौप्य पदक ठरले आहे. पदकतालिकेत भारताच्या नावावर आता ४६ पदके झाली आहे.

तिहेरी उडीच्या अंतिम फेरीत भारताच्या दोन्ही खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. एल्डहोस पॉलने १७.०३ मीटर उडी मारून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तर, त्याच्या पाठोपाठ अब्दुल्ला अबुबकर याने १७.०२ मीटर उडी मारून रौप्य पदक भारताच्या खात्यात जमा केले. या दोघांशिवाय, भारताचा प्रवीण चिथ्रावेल यानेही चांगला खेळ केला. तो चौथ्या स्थानावर राहिला. त्याचे कांस्य पदक थोडक्यात हुकले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यापूर्वी, बॉक्सिंगमध्ये भारताला दोन सुवर्णपदकांची कमाई झाली. महिलांच्या ४८ किली वजनी गटात नितू घांगसने सुवर्णपदक पटकावले. तिच्या पाठोपाठ अमित पंघालनेही अंतिम सामन्यात विजय मिळवून सुवर्ण पदक मिळवले.