राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुरू असलेले टी २० महिला क्रिकेट रंगात आले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत येऊन पोहचला आहे. बर्मिंगहॅम येथील एजबस्टन क्रिकेट मैदानावर भारत आणि इंग्लंड दरम्यान उपांत्य फेरीचा पहिला सामना होत आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर स्मृती मंधानाने आपल्या कर्णधाराचा हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. तिने वादळी अर्धशतक झळकावले आहे.

स्मृती मंधानाने आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये भारतीय म्हणून सर्वात जलद अर्धशतक केले आहे. अशी कामगिरी करून तिने सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा आपलाच विक्रम मोडला आहे. तिने अवघ्या २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ती ३२ चेंडूत ६१ धावा करून बाद झाली. तिच्या या वादळी खेळीमध्ये आठ चौकार आणी तीन षटकारांचा समावेश आहे.

Top 5 Oldest Player To Score A Century In IPL
IPL 2024 : रोहित शर्मासह ‘या’ पाच सर्वात वयस्कर खेळाडूंनी आयपीएलमध्ये झळकावलयं शतक, जाणून घ्या कोण आहेत?
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: शुबमन गिलच्या नावे आयपीएलमध्ये अजून एक मोठा रेकॉर्ड; रोहित, विराट, रहाणे सर्वांनाच टाकलं मागे
list of fastest bowlers in IPL 2024 and whole History
उमरान मलिकचा विक्रम मोडणार मयंक यादव? IPL मधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर? पाहा यादी

स्मृती मंधानाचे अर्धशतक राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे. याशिवाय, ती आतापर्यंत स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. तिने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही अर्धशतकीय खेळी केली होती. स्पर्धेत सर्वाधिक चौकार आणि षटकार मारण्याची कामगिरीही तिने केली आहे.

हेही वाचा – Video: मैदानात भारतीय राष्ट्रगीत सुरू होताच भावुक झाली ‘गोल्डन गर्ल’ साक्षी मलिक

बर्मिंगहॅमच्या एजबस्टन स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या उपांत्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या संघासाठी स्मृती आणि शेफाली वर्मा चांगली सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या गड्यासाठी ७६ धावांची भागीदारी केली. यादरम्यान स्मृतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, नवव्या षटकात ती ३२ चेंडूत ६१ धावा करून बाद झाली. इंग्लंडची कर्णधार नताली स्कायव्हरने तिला बाद केले.