David Warner shared a video of himself having fun with Australian team: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ ही स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून भारतात खेळवली जाणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सराव सामन्यांमध्ये सर्वच संघ आपली ताकद दाखवताना दिसत आहेत. केरळमधील ग्रीनफील्ड क्रिकेट स्टेडियम ४ सराव सामने आयोजित करत आहे. या स्टेडियममध्ये २९ सप्टेंबर रोजी दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात पहिला सामना होणार होता, परंतु पावसामुळे हा सामना नाणेफेक न होता रद्द करण्यात आला.

तिरुअनंतपुरममध्ये ३० सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स यांच्यात दुसरा सराव सामना खेळवला जाणार आहे. सराव सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ केरळमध्ये पोहोचून तेथील सुंदर दृश्यांचा आनंद घेताना दिसत आहे. ज्याचा एक व्हिडिओ ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

LSG fan video viral at Chepauk Stadium
CSK vs LSG : चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर लखनऊच्या ‘त्या’ चाहत्याच्या आनंदाला उरला नाही पारावार, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Highlights in Marathi
CSK vs LSG Highlights , IPL 2024 : लखनऊचा चेन्नईवर ६ गडी राखून विजय, स्टॉइनिसच्या १२४ धावांची खेळी ऋतुराजच्या शतकावर पडली भारी
Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Mathc Highlights in marathi
KKR vs LSG : कोलकाताचा ऐतिहासिक विजय! लखनऊचा ८ विकेट्सनी उडवला धुव्वा
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Updates in Marathi
DC vs KKR : केकेआरने रचला इतिहास! सुनील नरेनच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीसमोर ठेवले २७३ धावांचे लक्ष्य

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ नुकताच भारताविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळताना दिसला होता. या मालिकेतील शेवटचा सामना राजकोटमध्ये खेळला गेला, जिथे उष्णतेने खेळाडूंना खूप त्रास दिला. राजकोटच्या उष्णतेमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू थेट केरळला पोहोचले, तेथील वातावरण आणि सी-फेसिंग हॉटेलने ऑस्ट्रेलियन खेळाडूंची मने जिंकली.

हेही वाचा – Asian Games: सरबजोत आणि दिव्याने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्यपदकावर कोरले नाव

शुक्रवारी (२९ सप्टेंबर) केरळला पोहोचताच काही खेळाडू हॉटेलच्या कारमध्ये आरामदायी प्रवासाचा आनंद लुटताना दिसले, ज्याचा व्हिडिओ डेव्हिड वॉर्नरने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. व्हिडिओमध्ये मिचेल मार्श आणि मार्नस लाबुशेन देखील दिसत आहेत.

केरळमधील पावसाने सराव सामन्यांची वाढवली चिंता –

तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर खेळवण्यात येणारा पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या स्टेडियममध्ये ३ ऑक्टोबरला भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सराव सामना खेळवला जाणार आहे, त्याची तिकिटेही विकली गेली आहेत. पण केरळमधील पाऊस या सामन्यात अडथळा ठरू शकतो. तिरुवनंतपुरममध्ये गेल्या काही आठवड्यांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.

हेही वाचा – World Cup 2023: भारत आणि इंग्लंड संघात आज रंगणार सराव सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार लाइव्ह स्ट्रिमिंग

ऑस्ट्रेलियाचा संघ:

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.