वॉरक्लो, पोलंड येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषकाच्या चौथ्या टप्प्यात भारताच्या दीपिका कुमारीला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता तिचा मुकाबला कांस्यपदकासाठी असेल. वैयक्तिक रिकव्‍‌र्ह प्रकारात चीनच्या जिंग झुने दीपिकावर ६-५ अशी मात केली. कांस्यपदकासाठीच्या लढतीत तिच्यासमोर रशियाच्या तातिआना सेगिनाचे आव्हान असणार आहे.महिलांच्या कंपाऊंड एकेरी प्रकारात कोलंबियाच्या सारा लोपेझने पूर्वशा शेंडेला १४३-१४१ असे नमवले. अन्य भारतीयांना उपांत्यपूर्व फेरीही गाठता आली नाही.