भारत आणि न्यूझीलंड संघात तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना होळकर स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ९० धावांनी शानदार विजय मिळवला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप दिला. या सामन्यात न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉन्वे एकाकी झुंज देताना शतकी खेळी केली. त्याने या शतकी खेळीच्या जोरावर एक विक्रम आपल्या नावावर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यात भारतीय संघाने रोहित शर्मा (१०१) आणि शुबमन गिल (११२) यांच्या शतकी खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ९ बाद ३८५ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाला डेव्हॉन कॉन्वेच्या (१३८) शतकी खेळीच्या जोरावर ४१.२ षटकांत सर्वबाद २९५ धावाच करता आल्या. ज्यामुळे न्यूझीलंडला ९० धावांनी पराभव पत्कारावा लागला. त्याचबरोबर तीन सामन्यांची वनडे मालिकादेखील ०-३ अशी गमवावी लागली.

भारताविरुद्ध जलद शतक झळकावणारा दुसरा फलंदाज –

भारताविरुद्ध सर्वात जलद वनडे शतक झळकावणारा कॉन्वे हा दुसरा किवी फलंदाज ठरला आहे. मायकेल ब्रेसवेल त्याच्या पुढे आहे. ब्रेसवेलने चालू मालिकेतील पहिल्या सामन्यात ५७ चेंडूत शतक झळकावले. कॉन्वेने २००९ साली भारतासमोर ७२ चेंडूत शतक झळकावणाऱ्या जेसी रायडरला मागे सोडून दुसरे स्थान मिळवण्याचा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर माजी अनुभवी फलंदाज रॉस टेलर चौथ्या स्थानावर आहे. त्याने २०२० मध्ये ७३ चेंडूत हा पराक्रम केला होता. त्याच्यापाठोपाठ क्रिस केर्न्सचा क्रमांक लागतो. केर्न्सने १९९० मध्ये ७५ चेंडूत १०० धावा पूर्ण केल्या होत्या.

हेही वाचा – IND vs NZ 3rd ODI: सूर्यकुमारने षटकारांचे शतक झळकावत केला खास विक्रम; ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय

कॉन्वे उमरानचा बळी ठरला –

कॉन्वेने सहावा खेळाडू म्हणून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला ३२ व्या षटकात ‘रफ्तार के सौदागर’ उमरान मलिकने आपला शिकार बनवले. षटकाच्या चौथ्या चेंडूवर पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात कॉन्वेने कर्णधार रोहित शर्माला शॉर्ट मिडविकेटवर झेलबाद केले. १०० चेंडूंचा सामना केल्यानंतर त्याने १२ चौकार आणि ८ षटकारांसह १३८ धावांची खेळी केली. कॉन्वेने दोन महत्त्वाच्या भागीदारी केल्या. त्याने दुसऱ्या विकेटसाठी हेन्री निकोल्स (४२) सोबत १०६ धावांची आणि तिसऱ्या विकेटसाठी डॅरिल मिशेल (२४) सोबत ७८ धावांची भागीदारी केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devon conway became the second new zealand batsman to score the fastest century against india vbm
First published on: 24-01-2023 at 21:50 IST