Deandra Dottin on Gujarat Giants: गुजरात जायंट्स संघ महिला प्रीमियर लीगमध्ये गुणतालिकेत तळाशी आहे. गुजरातने आपल्या मोहिमेची सुरुवात मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभवाने केली. फ्रँचायझीने आपल्या संघात शेवटच्या क्षणी बदल केला, जो नंतर वादाचे कारण बनले. खरे तर गुजरात जायंट्सने लिलावादरम्यान वेस्ट इंडिजच्या डिआंड्रा डॉटिनचा आपल्या संघात समावेश केला होता. मात्र अखेरच्या क्षणी त्याला संघातून वगळण्यात आले. नंतर, फ्रँचायझीने डॉटिनच्या जागी किम गर्थला संघात स्थान दिले. महिला प्रीमियर लीगमधून वगळल्याबद्दल डिआंड्रा डॉटिनने मौन सोडले आहे. यावेळी तिने गुजरात जायंट्स संघ व्यवस्थापनावर निशाणा साधला.

गुजरात जायंट्स फ्रँचायझीचे निवेदन –

गुजरात जायंट्सने एका निवेदनात म्हटले होते की, “डिआंड्रा एक जागतिक दर्जाची क्रिकेटर आहे, ती संघाची उत्कृष्ट खेळाडू आहे. पण आम्हाला निर्धारित वेळेपर्यंत डिआंड्रा डॉटिनची वैद्यकीय मंजुरी मिळालेली नाही. महिला प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी अहवाल देणे अनिवार्य आहे. ती लवकरच मैदानात परतेल अशी आशा आहे.”

डिआंड्राने उत्तर दिले –

डिआंड्रा डॉटिनने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “भारतात होणाऱ्या महिला प्रीमियर लीगमधून नुकत्याच वगळण्याबाबत सुरू असलेल्या अटकळींबाबत मी एक संक्षिप्त विधान जारी करू इच्छितो. मी खूप निराश आहे की मला स्पर्धेतून वगळण्याचे कारण केवळ एक युक्तिवाद म्हणून स्पष्ट केले जाऊ शकते. मला महिला प्रीमियर लीगच्या लिलावात अदानी समूहाच्या मालकीच्या गुजरात जायंट्सने विकत घेतले. टूर्नामेंटच्या सुरुवातीला फ्रँचायझीने असा दावा केला होता की मी बरी होत असल्याने मला संघाबाहेर ठेवण्यात आले होते.”

ती पुढे म्हणाले की, “मला हे स्पष्ट करायचे आहे की मला किरकोळ पोटदुखी आणि सूज होती. ज्यासाठी मी डिसेंबर २०२२ मध्ये उपचार केले. त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी २०२३ मध्ये तज्ज्ञांनी आणखी २ रेफरल्स दिले. तपासणीनंतर मला तज्ज्ञांनी १३ फेब्रुवारीपर्यंत विश्रांती घेण्यास सांगितले. १४ फेब्रुवारीपासून फिटनेस आणि प्रशिक्षण सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.”

हेही वाचा – IND vs AUS ODI: सूर्याच्या जागी संजूला संधी देण्याच्या मागणीवर वसीम जाफरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘सॅमसन…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फ्रेंचायझीने चुकीचा अर्थ लावला –

डॉटिनने सांगितले की, “गुजरात जायंट्सने त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला. त्यांच्या म्हणण्यानुसार, गुजरात जायंट्सच्या फिजिओथेरपिस्टशी झालेल्या संवादात मी याबाबत स्पष्ट होते. मात्र, त्याचा गैरसमज झाला आणि नंतर संघ व्यवस्थापनाच्या सदस्यांना माझ्या पोटदुखीची माहिती देण्यात आली. जे मी सूचित केली नव्हती. ती पुढे म्हणाले, २० फेब्रुवारीपर्यंत माझ्यावर उपचार करणारे शल्यचिकित्सक डॉ. इयान लुईस यांनी वैद्यकीय मंजुरीची एक प्रत जायंट्सना सुपूर्द केली होती.”