आयसीसी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा झाली आहे. संघामध्ये विशेष बदल झाला नसला तरीही अनेक गोष्टी समजून घेणे महत्त्वाच्या आहेत. संघामध्ये जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलची वापसी झाली आहे. दोन्ही खेळाडूंना दुखापतींमुळे आशिया चषकात सहभागी होता आले नव्हते.

या संघात रोहित शर्मा कप्तान आणि केएल राहुल उपकप्तानाच्या भूमिकेत असतील. यानंतर विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंह यांचा समावेश आहे. मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर यांना स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे.

PAK vs SL Asia Cup 2022 : महत्त्वाचा झेल सोडलेल्या शादाब खानची भावुक पोस्ट; म्हणाला, “ही चूक…”

संघ निवडीमागील महत्त्वाच्या पाच गोष्टी जाणून घेऊया.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • आशिया चषकादरम्यान, टीम इंडियाकडे दर्जेदार वेगवान गोलंदाजांची कमतरता होती, त्यामुळे बुमराह आणि हर्षलच्या वापसीमुळे संघाची ही कमतरता दूर होणार आहे. बुमराह आणि हर्षल यांना टी२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकांमुळे सामन्यांचा सराव मिळू शकतो. यामुळे आयसीसी टी२० विश्वचषकासाठी त्यांची नीट तयारी होईल.
  • आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी मोहम्मद शमी मुख्य संघाचा भाग असेल असे वाटत होते, परंतु सध्या तो स्टँडबाय खेळाडूंपैकी एक आहे. शमीचा अनुभव टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियात उपयोगी पडू शकतो. तो संघाचा भाग नसला तरी त्याच्या उपस्थितीमुळे युवा वेगवान गोलंदाजांना मदत होऊ शकते.
  • अलीकडच्या काळात टी२० सामन्यांमध्ये ऋषभ पंतचा रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही. त्यामुळे त्याला पुढील स्पर्धेत खेळवले जाणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र आयसीसी टी२० विश्वचषकासाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला जास्त मेहनत करावी लागणार आहे.

‘…आणि ती हो म्हणाली’ निसर्गरम्य ठिकाणी गुडघ्यावर बसून रणजी क्रिकेटपटूने ‘या’ महिला क्रिकेटरला केलं प्रपोज; Photo Viral

  • या स्पर्धेसाठी आर अश्विनचा मुख्य संघात समावेश करण्यात आला आहे. तर, रवी बिश्नोईला स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे. मात्र बिश्नोईने संधीचे सोने करत बाहेरील स्पर्धांमध्ये स्वतःला सिद्ध केले असताना त्याला संघाबाहेर बसवणे अनेकांना पटलेले नाही.
  • आयपीएल तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही अर्शदीप सिंगने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. याचाच परिणाम म्हणून त्याला आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघात सहभागी करून घेण्यात आले आहे.