भारताची ‘फुल’राणी सायना नेहवालने बॅडमिंटन चॅम्पियन अक्षय देवाळकरच्या श्रीमुखात भडकावली. पण, सायनाने लगावलेली थप्पड खरी नसून सध्या नेटकरांमध्ये लोकप्रीय झालेल्या ‘डबस्मॅश’ व्हिडिओतील आहे. बॉलीवूड चित्रपटांतील लोकप्रीय संवाद डब करून व्हिडिओ रेकॉर्ड करता येणाऱया ‘डबस्मॅश’ अॅपचा वापर करत सायनाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. आपल्या आवडत्या कलाकारांचे संवाद डब करून व्हिडिओ तयार करण्याची सोय असल्याने सध्या ‘डबस्मॅश’ या अॅपची नेटकरांमध्ये क्रेझ वाढली आहे. याआधी सलमान खान, सोनाक्षी सिन्हा यांनीही एक मनोरंजक डबस्मॅश व्हिडिओ शेअर केला होता. सायना नेहवाललाही डबस्मॅशचा मोह आवरता आला नाही. सायनाने ‘हेराफेरी’ चित्रपटातील अभिनेते परेश रावल यांचा ‘ये बाबुराव का स्टाईल है’ हा बहुचर्चित संवाद म्हणत अक्षय देवाळकरच्या कानशिलात लगावतानाचा व्हिडिओ तयार केला आहे. डबस्मॅशच्या व्हिडिओंना नेटकरांची चांगली पसंती देखील मिळत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jun 2015 रोजी प्रकाशित
सायना नेहवाल चॅम्पियन अक्षय देवाळकरच्या श्रीमुखात भडकावते तेव्हा..
भारताची 'फुल'राणी सायना नेहवालने बॅडमिंटन चॅम्पियन अक्षय देवाळकरच्या श्रीमुखात भडकावली.

First published on: 03-06-2015 at 11:59 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dubsmash fever hits badminton champ saina nehwal