Shreyas Iyer Troll after came to bat with Sunglasses : श्रेयस अय्यरच दिवस खूप वाईट आहे. दुलीप ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात तो फ्लॉप ठरला होता. यानंतर बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची टीम इंडियात निवड झाली नाही. आता दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यातही हा खेळाडू सपशेल अपयशी ठरला. अशाप्रकारच्या अपयशानेही त्याची खिल्ली उडवली जात आहे. श्रेयस अय्यर शून्यावर बाद झाला म्हणून नव्हे तर त्याच्या शैलीमुळे खिल्ली उडवली जात आहे. वास्तविक, अय्यर पहिल्या डावात फलंदाजीला गॉगल घालून बॅटिंगला उतरला होता.

श्रेयस अय्यरला खलील अहमदने बाद केले. या डाव्या हाताच्या गोलंदाजाने त्याला आकिब खानकरवी झेलबाद केले. तो सातव्या चेंडूवरच शून्यावर बाद झाला. त्यामुळे त्याची खिल्ली उडवली जात आहे. कारण चाहत्यांना त्याचे गॉगल घालून बॅटिंगला येणे आवडले नाही. काही चाहते म्हणाले की सूर्य त्या दिशेला नसतानाही त्याने गॉगल घातला होता. बरं, चाहते असेच ट्रोल करत राहतात पण श्रेयस अय्यर आऊट होणे, त्याच्यासाठी अजिबात चांगले नाही.

विशाखापट्टणम कसोटीनंतर टीम इंडियातून बाहेर –

भारत क विरुद्धच्या सामन्यातही अय्यर पहिल्या डावात ९ धावा करून बाद झाला होता. दुसऱ्या डावात त्याने अर्धशतक झळकावले असले तरी टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी अय्यरला सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. श्रेयस अय्यरच्या कसोटी कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने यावर्षी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळली होती. विशाखापट्टणम कसोटीनंतर त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले होते.

हेही वाचा – IND vs BAN : कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया चेन्नईत दाखल, विराट-रोहितचा विमानतळावरील VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रेयस अय्यरची कसोटी कारकीर्द –

अय्यरने आतापर्यंत १४ कसोटी सामने खेळले असून एक शतक आणि ५ अर्धशतकांच्या जोरावर त्याने ८११ धावा केल्या आहेत. आता अय्यर दीर्घ फॉर्मेटमध्ये कधी पुनरागमन करतो हे पाहणे बाकी आहे. टीम इंडियाला अजूनही न्यूझीलंडसोबत कसोटी मालिका खेळायची आहे. वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी टीम इंडियात पुनरागमन करण्याचा अय्यरचा उद्देश असेल.