हरमनप्रीत कौरच्या सेनेने नवी मुंबईतल्या नेरुळ इथल्या डीवाय पाटील स्टेडियवर दक्षिण आफ्रिकेला नमवत पहिल्यावहिल्या विश्वविजेतपदावर नाव कोरलं. डीवाय पाटील स्टेडियम इथे खेळणं टीम इंडियासाठी किमयागार ठरलं. भारतीय संघाने शेवटचे सलग चार सामने याच मैदानावर खेळले. त्यापैकी तीन जिंकत जेतेपदाची कमाई केली.
भारतीय संघाने स्पर्धेचा सलामीचा सामना गुवाहाटी इथे श्रीलंकेविरुद्ध खेळला. भारताला या सामन्यात विजयासाठी संघर्ष करावा लागला. यानंतर भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी कोलंबोला रवाना झाला. पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर या सामन्याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. भारताने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला. कोलंबोहून भारतीय संघ विशाखापट्टणम इथे पोहोचला. दक्षिण आफ्रिकेने झुंजार खेळ करत बाजी मारली. याच मैदानात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाने दिलेलं ३३१ धावांचं डोंगराएवढं लक्ष्य पार केलं. दोन पराभव बाजूला सारत भारतीय संघ इंदूरला रवाना झाला. इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ सुस्थितीत होता. मात्र अचानक झालेल्या घसरगुंडीमुळे इंग्लंडने ४ धावांनी विजय मिळवला.
यानंतर भारतीय संघ नवी मुंबईत पोहोचला. बाद फेरीसाठी भारतीय संघाला जिंकणं क्रमप्राप्त होतं. परिचित खेळपट्टीवर भारतीय संघाने दमदार खेळ करत न्यूझीलंडला नमवलं आणि सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. काही दिवसांनंतर भारताच्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पावसामुळे सातत्याने व्यत्यय येत राहिला. अखेर हा सामना रद्द करावा लागला. यानंतर भारतीय संघासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. सेमी फायनलच्या दडपणाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने ३३८ धावांची मजल मारली. जेमिमा रॉड्रिग्जच्या मॅरेथॉन शतकी खेळीच्या बळावर भारताने महिला वनडे क्रिकेटमधली धावांचा पाठलाग करतानाची सर्वोच्च धावसंख्या पार केली आणि ऐतिहासिक विजय मिळवला. सर्वसमावेशक सांघिक कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने देदिप्यमान विजय मिळवला. फायनलच्या मुकाबल्यात तुल्यबळ दक्षिण आफ्रिकेला चीतपट करत भारतीय संघाने इतिहास घडवला.
डीवाय आहे बालेकिल्ला
२०२२ मध्ये भारतीय संघाने या मैदानावर दोन सामने खेळले होते. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका याच मैदानात खेळली होती. भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. गेल्या वर्षअखेरीस याच मैदानावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळली होती. भारताने या मालिकेत विजय मिळवला होता.
याच मैदानावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० मालिकाही खेळली होती. दोन वर्षांपूर्वी याच मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात एकमेव कसोटी सामना झाला होता. भारतीय संघाने तब्बल ३४७ धावांनी हा सामना जिंकला होता. या मैदानाची, खेळपट्टीची, वातावरणाची भारतीय संघाला चोख माहिती आहे.
दक्षिण आफ्रिकेची भ्रमंती
दक्षिण आफ्रिकेसाठी अंतिम मुकाबला हा स्पर्धेतला डीवाय पाटील स्टेडियमवरचा पहिलाच सामना आहे. गुवाहाटी, इंदूर, विशाखापट्ट्णम (२), कोलंबो (२), इंदूर, गुवाहाटी असं पूर्ण भारतभर आणि भारताबाहेर भ्रमंती करून दक्षिण आफ्रिकेचा संघ नवी मुंबईत पोहोचला. मैदानातली खेळपट्टी
