कर्णधारपदी सिया, प्रीतिशची नियुक्ती
ग्वाल्हेर येथे होणाऱ्या १४ वर्षांखालील मुलामुलींच्या राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पध्रेसाठी जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या संघात नागपूरच्या आठ बास्केटबॉलपटूंचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा २५ ते २९ एप्रिलदरम्यान होणार आहेत. मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी नागपूरच्या सिया देवधर आणि मुलांच्या संघाच्या कर्णधारपदी प्रीतिश कोकाटेची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय शालेय स्पध्रेसाठी १२ मुलींचा आणि १२ मुलांचा संघ नुकताच जाहीर झाला आहे. मुलींच्या संघात नागपूर येथील प्रतिभावंत सिया देवधर, आभा लाड, सहेज कौर, पूर्वी महल्ले आणि मुलांच्या संघात रजत जोशी, आकाश शर्मा, अव्दैत जगताप, हर्षल मारोटकर यांचा समावेश आहे. शिवाजीनगर जिमखानाच्या मदानावर शिबीर घेण्यात आले होते. या शिबिरातील कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली. गतवर्षी झालेल्या स्पध्रेत मुलींच्या गटात महाराष्ट्राने सुवर्णपदक पटकाविण्याची कामगिरी केली, तर मुलांच्या संघाला उपांत्यपूर्व सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष शत्रुघ्न गोखले, शशिकांत कळंबे यांनी राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पध्रेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
मुली : सिया देवधर (कर्णधार), निकिता आपटे, ध्रुवी जैन, रिद्धी सोने, वेदिका सूद, त्विशा गाला, आभा लाड, परिधा भागवत, सेहज कौर, पूर्वी महल्ले, अदिती नार्वेकर, राधा हरदास. प्रशिक्षक- जानकी कुळकर्णी
मुले : प्रीतिश कोकाटे (कर्णधार), ज्ञानेश पाटील, यशराज वाघमारे, अव्दैत जगताप, दीप उकिरकर, स्वयंम मुंदडा, पार्थ दांडे, रजत जोशी, सिद्धांतनयन बजाज, आकाश शर्मा, विजय सुळे, हर्षल मारोटकर. प्रशिक्षक- राजेश क्षत्रीय.