Long-serving Hockey India CEO Elena Norman resigns : एलेना नॉर्मन यांनी हॉकी इंडियाच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. एलेना नॉर्मन गेल्या १३ वर्षांपासून हॉकी इंडियाच्या सीईओ होत्या. मात्र आता त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एलेना नॉर्मन यांच्या कार्यकाळात भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांनी नवीन उंची गाठली. या काळात भारतीय हॉक संघाने सर्वोत्तम जागतिक क्रमवारी गाठली. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतही आपले कौशल्य दाखवले. भारतीय पुरुष संघाने तब्बल ४१ वर्षांनंतर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. त्याचबरोबर भारतीय महिला संघ चौथ्या क्रमांकावर राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एलेना नॉर्मनचा कार्यकाळ कसा होता?

भारतीय हॉकी फेडरेशनने, एलेना नॉर्मनच्या नेतृत्वाखाली, २०१८ आणि २०२३ मध्ये पुरुष हॉकी विश्वचषकाचे सलग दोन आवृत्त्या आयोजित केल्या. याशिवाय २०१६ आणि २०२१ मध्ये दोन ज्युनियर पुरुष विश्वचषकांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच हॉकी इंडिया लीगच्या पाच आवृत्त्यांचे यशस्वी आयोजन केले.

एलेना नॉर्मनच्या कार्यकाळात, हॉकी इंडियाने एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१५ आणि २०१७ मध्ये एफआयएच वर्ल्ड लीग फायनल, २०१९ आणि २०२४ मध्ये एफआयएच ऑलिम्पिक पात्रता तसेच एफआयएच हॉकी प्रो लीग देशांतर्गत खेळांसह अनेक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांचे आयोजन केले.

हेही वाचा – Ranji Trophy : मुंबईच्या तुषार-तनुषने मोडला ७८ वर्षांपूर्वीचा विक्रम, बडोद्याविरुद्ध खेळताना रचला इतिहास

काय म्हणाले हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की?

त्याचवेळी हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी एलेना नॉर्मन यांच्या राजीनाम्यावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की मी एलेनाचा वेळ आणि समर्पणाबद्दल आभार व्यक्त करू इच्छितो. केवळ हॉकी इंडियाचा अध्यक्ष या नात्यानेच नाही, तर एक माजी खेळाडू आणि उत्कट हॉकी प्रेमी या नात्याने, गेल्या १२-१३ वर्षांतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल मी औपचारिकपणे स्वीकार करू इच्छितो आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elena norman resigned as ceo of hockey india after a long tenure of 13 years vbm
First published on: 27-02-2024 at 14:54 IST