ऑस्ट्रेलियात आयोजित केल्या गेलेल्या आठव्या टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (१३ नोव्हेंबर) खेळला गेला. मेलबर्न येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला ५ गडी राखून पराभूत करत विश्वचषक आपल्या नावे केला. या अंतिम सामन्यात इंग्लंडसाठी पुन्हा एकदा अनुभवी अष्टपैलू बेन स्टोक्सने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. अखेरपर्यंत नाबाद राहत त्याने एक वेळ अवघड झालेल्या या सामन्यात इंग्लंडला विजय मिळवून दिला. सहा वर्षांपूर्वी याच टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तो इंग्लंडसाठी खलनायक ठरलेला. मात्र, हातात त्यानेच इंग्लंडला विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.

टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर माजी क्रिकेटपटूंनी कर्णधार बाबर आझम आणि संघाचे सांत्वन केले आहे. शाहीद आफ्रिदीपासून ते उमर गुल पर्यंत अनेक माजी खेळाडूंनी पाकिस्तान संघाचे कौतुक केले आहे. बाबर आझम आणि संपूर्ण पाकिस्तान संघांचा आम्हाला अभिमान आहे अशा आशयाचे ट्विटर ट्विट करत त्यांनी संघाचे मनोधर्य उंचावण्याचे प्रयत्न केला आहे. आशा सौडू नका पुढच्यावेळी नक्की आपण विश्वचषक जिंकू अशा आशयचे उद्गार काढले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंडचा मध्यक्रमातील फलंदाज १३व्या षटकात झेलबाद झाला. त्याने शादाब खान गोलंदाजी करत असताना शाहीन आफ्रिदीच्या हातात विकेट गमावली. पण यादरम्यान आफ्रिदीच्या पायाला दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले. दुखापतीनंतर आफ्रिदी जास्त वेळ मैदानात खेळू शकला नाही. झेल घेताना झालेल्या दुखापतीमुळे त्याला गोलंदाजी करता आली नाही, ज्याचा फायदा थेट इंग्लंडच्या फलंदाजांनी उचलला. इंग्लंड एक षटक राखुन अंतिम सामन्यात विजय मिळवला. ही दुसरी वेळ आहे, जेव्हा इंग्लड टी२० विश्वचषकाचा विजेता संघ बनला आहे. यापूर्वी २०१० मध्ये इंग्लंडने त्यांचा पहिला टी२० विश्वचषक जिंकला होता.