England football team head coach Gareth Southgate praised Ben Stokes decision: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांत अॅशेस मालिकेतील पहिला केस सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी बेन स्टोक्सने डाव घोषित केला होता. ज्याच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. किंबहुना, अनेक दिग्गज खेळाडूंनी बेन स्टोक्सच्या या निर्णयाला चुकीचे म्हटले, तर अनेकांनी त्याच्या निर्णयाचे कौतुक केले. अशात आता फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरेथ साउथगेटने बेनचे कौतुक केले.

याआधी पहिल्या दिवशी कोणत्याही संघाला डाव घोषित करताना पाहिले नाही –

बेन स्टोक्सच्या या निर्णयावर क्रिकेटचे दिग्गज खेळाडूच नाही, तर इंग्लंड फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने या निर्णयाचे खूप कौतुक केले आणि इंग्लंडच्या कर्णधाराचा हा निर्णय खूपच आश्चर्यकारक असल्याचे म्हटले. यासोबतच त्याने सांगितले की, या पूर्वा पहिल्याच दिवशी डाव घोषित करणारा आपण कोणताही संघ पाहिला नाही.

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना गॅरेथ साउथगेट म्हणाला की, “मला वाटते की पहिल्याच दिवशी ८ बाद ३९३ धावांवर डाव घोषित करणारा हा माझ्या आयुष्यातील पहिला संघ आहे. खरंच, तो एक आश्चर्यकारक निर्णय असेल. खरं तर शेवटी लोक त्यांच्याप्रमाणे निकालावर निर्णय घेतील, जे तुम्ही प्रशिक्षक म्हणून निर्णय घेता.”

हेही वाचा – IND vs WI: वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर अजिंक्य रहाणे इंग्लंडला जाणार, जाणून घ्या काय आहे कारण?

दुसरीकडे, सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर या संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट गमावून ३९३ धावा केल्या आणि पहिल्या दिवशीच डाव घोषित केला. इंग्लंडकडून जो रूटने सर्वोत्तम फलंदाजी केली. त्याने दमदार शतकी खेळी केली. त्याचवेळी पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियन संघाने विकेट न गमावता १४ धावा केल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीला उतरला असला तरी त्यांनी आपले तीन विकेट फार लवकर गमावले. मात्र त्यानंतर उस्मान ख्वाजाने उत्कृष्ट शतकी खेळी करत संघाला सावरले. यासह ट्रॅव्हिस हेडने अर्धशतकी खेळी खेळली. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ११२ षटकांनंतर ६ गडी गमावून ३७२ धावा केल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर उस्मान ख्वाजा १४१ आणि कर्णधार पॅट कमिन्स २७ धावांवर खेळत आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया अजून २७ धावांनी इंग्लंडच्या मागे आहे.