हॉकीचे जादूगार म्हणून परिचित असलेले मेजर ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ द्यावा या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी अनेक ज्येष्ठ खेळाडू व चाहत्यांनी पंतप्रधान कार्यालयावर मोर्चा नेला व मागणीचे निवेदन सादर केले.
ध्यानचंद यांचा मुलगा व माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू अशोककुमार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात जफर इक्बाल, दिनेश चोप्रा, राजेश चौहान, माजी प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांच्यासह अनेक खेळाडूंनी भाग घेतला. अशोककुमार, के.अरुमुगम यांच्यासह अनेक खेळाडूंच्या सह्य़ा असलेले निवेदन पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात आले.  सचिन तेंडुलकर याला भारतरत्न सन्मान देण्यात आल्यानंतर ध्यानचंद यांनाही हा मान मिळावा या मागणीला जोर वाढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex players march to pmo demand bharat ratna for dhyan chand
First published on: 09-01-2014 at 03:24 IST