एकाच कालखंडात खेळायला सुरुवात केलेल्या आणि आपापल्या संघांसाठी वर्षानुवर्ष धावांची टांकसाळ उघडणाऱ्या क्रिकेटविश्वातल्या चार शिलेदारांना फॅब फोर म्हटलं जातं. भारताचा विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ, इंग्लंडचा जो रुट आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन या चौकडीला फॅब फोर म्हटलं जातं. धावा, शतकं यांचे नवनवे विक्रम हे चौघे करत असतात. शुक्रवारी चौकडीतल्या एकाने म्हणजे केन विल्यमसनने शंभराव्या कसोटीत खेळण्याचा मान पटकावला. फॅब फोरच्या शंभराव्या कसोटीत एक भारतीय आहे सांगितलं तर आश्चर्य वाटतंय ना पण ते खरं आहे. आयसीसी एलिट पॅनेलमधील भारतीय पंच नितीन मेनन या चौघांच्याही शंभराव्या कसोटीत पंचगिरी करत होते. आधुनिक काळातील चार महान फलंदाजांना शंभराव्या कसोटीत खेळण्याचं भाग्य मेनन यांना लाभलं आहे.

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्या कसोटी मालिकेसोबतच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांमध्ये सुध्दा कसोटी मालिका खेळवली जात आहे. धरमशालामध्ये सुरू असलेला पाचवा कसोटी सामना भारताचा फिरकीपटू आर अश्विन आणि इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो आपला १०० वा कसोटी सामना खेळत आहेत तर क्राईस्टचर्च येथे ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत किवी संघाचे दोन अनुभवी खेळाडू विस्फोटक फलंदाज केन विल्यमसन आणि गोलंदाज टीम साऊथी हे दोघेही त्यांचा १०० वा कसोटी सामना खेळत आहेत.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
CSK vs LSG सामन्यानंतर IPL कडून दोन्ही संघांच्या कर्णधारांवर कारवाई, ऋतुराज-राहुलला १२ लाखांचा दंड
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Gautam Gambhir Praises MS Dhoni
IPL 2024 CSK vs KKR : चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी गंभीरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “धोनी हा एक कुशल…”

केन विल्यमसन हा आधुनिक काळातील क्रिकेटमधील फॅब फोर फलंदाजांच्या यादीतील फलंदाज आहे, ज्यामध्ये आस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, इंग्लंड संघाचा जो रूट आणि भारतीय संघाचा विराट कोहली यांचा समावेश आहे. हे सर्वच खेळाडू आपला १०० वा कसोटी सामना खेळले आहेत. पण योगायोगाची बाब म्हणजे या चारही फलंदाजांच्या १०० व्या कसोटी सामन्यात एक पंच मैदानात उपस्थित होते. ते म्हणजे भारताचे पंच नितीन मेनन.

फॅब फोर म्हणजे नेमकं काय?

स्टीव्ह स्मिथ, जो रूट, केन विल्यमसन आणि विराट कोहली यांना आधुनिक क्रिकेटमधील फॅब फोर म्हटले जाते. कसोटी क्रिकेटमधील फॅब फोर हा शब्द प्रथम न्यूझीलंड संघाचे माजी कर्णधार दिवंगत मार्टिन क्रो यांनी प्रथम वापरला होता. ऑगस्ट २०१४ मध्ये क्रिकइन्फोमधील एका लेखामध्ये त्यांनी भाकीत केले होते की;कोहली, रूट, स्मिथ आणि विल्यमसन हे फॅब फोरमधील फलंदाज आपापल्या देशांचे भावी कर्णधार बनतील.

त्यांनी हे भाकीत केले तेव्हा जो रूट (५०.९४) वगळता, इतर तिन्ही फलंदाजांची सरासरी त्यावेळेस ५०च्या ही वर नव्हती. सध्यपरिस्थिती पाहता क्रो यांची दूरदृष्टी स्पष्ट दिसून येते. त्यांनी या चारही फलंदाजांवर अतूट विश्वास दाखवत म्हटले होते की हे चारही फलंदाज कसोटीमधील पहिल्या क्रमांकाचे फलंदाज बनतील.त्यासोबतच विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्येही आपल्या खेळाची चमक दाखवेल असे त्यांनी सांगितले होते.

मार्टिन क्रो यांचे वक्तव्य


“माझ्या मते हे सर्वच अव्वल दर्जाचे कसोटी फलंदाज म्हणून नावारूपास येतील. तर कोहलीचे लक्ष्य हे एकदिवसीय क्रिकेटवरही आहे.कदाचित मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमधील त्याची कामगिरी आणि प्राधान्य त्याला कसोटीत मागे ठेवेल का? तीन वेगवेगळे फॉरमॅट खेळताना आपला खेळ कायम राखणे ही आधुनिक काळातील या फलंदाजांसमोरील सर्वात आव्हानात्मक बाब आहे.”

भारताचा रनमशीन विराट कोहलीने मार्च २०२२ मध्ये श्रीलंकेविरूध्द मोहालीच्या मैदानावर आपला १०० वा कसोटी सामना खेळला होता. त्या सामन्यात नितीन मेनन आणि वीरेंद्र शर्मा हे मैदानावरील पंच होते. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने फेब्रुवारी २०२१ मध्ये चेन्नईच्या मैदानावर भारताविरूध्द १०० वी कसोटी खेळली होती. तेव्हा पंच अनिल चौधरी यांच्यासमवेत नितीन मेनन हे पंच म्हणून उपस्थित होते. रूटने या सामन्यात २१८ धावा केल्या होत्या. यासोबतच १०० व्या कसोटीत द्विशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला होता,त्यामुळे हा सामना रूटकरता खूपच संस्मरणीय ठरला.

स्टीव्ह स्मिथने जुलै २०२३ मध्ये तिसऱ्या अॅशेस कसोटीत आपला १०० वा सामना खेळला होता.इंग्लंडने ३ विकेट्स राखून विजय मिळवलेल्या या सामन्यात नितीन मेनेन श्रीलंकेच्या कुमार धर्मसेना यांच्यासोबत मैदानावर पंच म्हणून होते. आता विल्यमसनच्या १०० व्या कसोटी सामन्यातही नितीन मेनन पंच आहेत. विल्यमसनला त्याच्या १०० व्या कसोटीत मोठी कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या कसोटीत ५ विकेट्स घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने त्याला १७ धावांवर LBW आऊट केले.

विराट आणि पंच नितीन मेनन यांच्यातील वाद

मार्च २०२३ मध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारताच्या ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या कसोटीत विराट आणि मेनन यांच्यातील प्रसंग चर्चेचा विषय ठरला होता. विराटने मैदानातच मेनन यांना ट्रोल केले होते. फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या त्या खेळपट्टीवर भारतीय संघ विकेट घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळेस टीम इंडियाने ट्रॅव्हिस हेड एलबीडब्ल्यू आऊट असल्याचे अपील केले. कारण तोच भारताची पहिली विकेट ठरणार होता.

पण मेनन यांनी भारताचे हे अपील फेटाळून लावले.पंचाच्या निर्णयानंतर भारताने रिव्ह्यू घेतला पण हेड बाद नव्हता.अश्विन पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत असताना कोहलीने टिपण्णी केली. “मी असतो तर आऊट दिलं असतं…” विराट फलंदाजी करत असताना मेनन यांनी त्याला बाद दिले होते. पण कोहलीच्या चाहता वर्गाने आऊट नसतानाही त्यांना बाद दिल्याने धारेवर धरले होते. पण विराटच्या या टिपण्णीनंतरही त्यांनी प्रत्युत्तरात हसून अंगठा दाखवला होता.