भारतीय क्रिकेटपटूंबाबत चाहत्यांना असलेली क्रेझ कोणापासूनही लपलेली नाही. आपल्या स्टार खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी चाहते काय करतील, हे सांगणेही अवघड आहे. रांची येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एका चाहत्याने असे काही केले, ज्यानंतर तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी-२० सामना रांचीत खेळला गेला. यावेळी सर्व सुरक्षा व्यवस्था झुगारून भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या जबरा चाहत्याने मैदानात उडी मारली आणि धावतच रोहितपर्यंत पोहोचला. या चाहत्याला रोहितच्या पायाला स्पर्श करायचा होता. पण रोहितने त्याला त्याच्या जवळ येऊ दिले नाही.

रोहितने नकार दिल्यानंतर या चाहता जमिनीवर लोटांगण घालून त्याला नमस्कार करू लागला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चाहत्याला पकडण्यासाठी सुरक्षा कर्मचारीही धावले. पण तो पुढे गेला. ज्या पॅव्हेलियनमधून चाहत्याने मैदानात प्रवेश केला, ते व्हीव्हीआयपींसाठी राखीव आहे. त्या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही.

हेही वाचा – निष्काळजीपणाचा कळसच! २० वर्षांपासून क्रिकेट खेळणारा पाकिस्तानचा शोएब मलिक ‘असा’ झाला धावबाद; पाहा VIDEO

आपल्या आवडत्या खेळाडूला जवळून पाहण्यासाठी चाहते मैदानात उतरण्याची ही पहिलीच वेळ नाही. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीलाही अनेकदा अशा घटनांना सामोरे जावे लागले.

असा रंगला सामना…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा टी-२० सामना जिंकत तीन सामन्यांची मालिका खिशात टाकली आहे. रांचीमध्ये रंगलेल्या या सामन्यात रोहितने पुन्हा टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दमदार सुरुवात केलेल्या न्यूझीलंडचा संघ शेवटच्या षटकात धावा जमवण्यात अपयशी ठरला. २० षटकात न्यूझीलंडने ६ बाद १५३ धावा केल्या. भारताचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने २५ धावांत २ बळी घेत उत्तम पदार्पण केले. शेवटच्या ३ षटकात न्यूझीलंडला १५ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी अर्धशतके ठोकली. त्यांनी केलेल्या ११७ धावांच्या भागीदारीमुळे भारताला १७.२ षटकातच ७ गडी राखून हा विजय मिळाला. हर्षलला सामनावीर पुरस्कार मिळाला. तिसरा आणि अंतिम सामना २१ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे.