२०२६ ची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा आशियाबाहेर होणार असल्याचे फिफा अध्यक्ष सेप ब्लाटर यांनी स्पष्ट केले आहे. ‘‘२०२६ च्या विश्वचषक स्पध्रेच्या आयोजनासाठी आशिया उपखंडातील देश वगळता जगातील अन्य देशांना संधी मिळेल, असा निर्णय कार्यकारिणी समितीने घेतला आहे,’’ अशी माहिती ब्लाटर यांनी दिली.
२०२२ च्या विश्वचषकाचे यजमानपद कतारला मिळाले आहे आणि फिफाच्या नियमानुसार एका खंडातील देशांना सलग विश्वचषकाचे आयोजन करता येणार नाही. त्यामुळे आशिया खंड या शर्यतीतून बाद झाला आहे. त्यामुळे २०२६ साठी इंग्लंड किंवा अमेरिका दावा करू शकते. फिफाच्या या खेळीमुळे इंग्लंड आणि अमेरिकेतून ब्लाटर यांना होत असलेला विरोध मावळण्याची शक्यता फुटबॉल क्षेत्रात वर्तविण्यात येत आहे.