फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशनमागे (फिफा) लागलेल्या चौकशीच्या ससेमिऱ्यामुळे २०२६च्या विश्वचषक स्पध्रेच्या आयोजनाची निविदा प्रक्रिया पुढे ढकलण्याची माहिती फिफाचे सरचिटणीस जेरॉम व्ॉलस्के यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘अशा परिस्थितीत निविदा प्रक्रिया घेणे अयोग्य ठरेल. त्यामुळे ती पुढे ढकलण्यात येत आहे.’’ ही निविदा प्रक्रिया २०१७मध्ये क्वालालम्पूर येथे पार पडेल. २०१८ आणि २०२२च्या विश्वचषक स्पध्रेच्या आयोजनासाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्विस आणि अमेरिकन पोलिसांनी केला आहे. त्याचा तपास सुरू असताना २०२६च्या विश्वचषकासाठी निविदा प्रक्रिया नको, असा पवित्रा फिफाने घेतला आहे.