जगाला फुटबॉलचा नवा चॅम्पियन मिळाला आहे. फिफा विश्वचषक (FIFA 2022) विजेतेपदाच्या सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा ४-२ असा पराभव केला. या विजयासह अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही पूर्ण झाले. मेस्सीने संपूर्ण विश्वचषकात आपल्या खेळावर वर्चस्व गाजवले आणि अंतिम फेरीतही एकूण तीन गोल केले.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. यासोबतच ज्या गुंतवणूकदारांनी नायके आणि आदिदाससारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती, त्यांनीही याकडे डोळे लावले होते. आदिदास अर्जेंटिना प्रायोजक आणि नायके फ्रेंच संघ प्रायोजक आहेत.

Tristan Stubbs fielding video viral in DC vs GT Match
DC vs GT : ट्रिस्टन स्टब्सच्या सीमारेषेवरील शानदार फिल्डिंगने सामन्याला दिली कलाटणी, VIDEO व्हायरल
gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
ipl 2024 lsg vs csk match noise levels peak as ms dhoni walks out to bat in lucknow ekana stadium quinton de kock wife shares photo
धोनीच्या एन्ट्रीनंतरचा स्टेडियममधील ‘तो’ माहोल प्रेक्षकांसाठी ठरू शकतो घातक! क्विंटन डिकॉकच्या पत्नीने पोस्ट केला PHOTO

आदिदासचे शेअर्स वधारले –

फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या निकालाचा परिणाम आदिदास आणि नायकेच्या शेअर्सवर दिसून येत आहे. अर्जेंटिनाच्या संघाने आदिदासची जर्सी परिधान करून स्पर्धेत प्रवेश केला आणि विजेतेपदही पटकावले. यानंतर आदिदासच्या शेअर्समध्ये तेजी आली. कंपनीचे शेअर्स १.९३ टक्क्यांनी वाढून युरो १२१.३० (फ्रँकफर्ट स्टॉक एक्सचेंज) वर बंद झाले. दुसरीकडे, संघाच्या पराभवानंतर फ्रेंच प्रायोजक नायकेचे शेअर्स कोसळले. फ्रँकफर्ट स्टॉक एक्स्चेंजवर नायकेचे शेअर्स १.९६ टक्क्यांनी घसरून १०० युरोवर बंद झाले.

हेही वाचा – Fifa WC 2022 Final: मेस्सीच्या पत्नीने विजयानंतर व्यक्त केल्या भावना; म्हणाली, ‘इतकी वर्षे… ‘

विश्वचषकादरम्यान घेतली उसळी –

या वर्षाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास आदिदासच्या शेअर्समध्ये ५३.२६ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. मात्र विश्वचषक सुरू होण्यापूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये तेजीची नोंद झाली होती. ३ नोव्हेंबरपासून आतापर्यंत कंपनीच्या शेअरच्या किमतीत २८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

मोठ्या प्रमाणात झाली जर्सीची विक्री –

फ्रान्सविरुद्धच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी आदिदासने अर्जेंटिनाची स्ट्रीप जर्सी जगभर विकली. लिओनेल मेस्सीचे चित्र असलेल्या आदिदास जर्सीला खूप मागणी होती. अनेक ठिकाणी जर्सीचा स्टॉकही संपला होता. कंपनीच्या वाढलेल्या विक्रीचा परिणाम विश्वचषकादरम्यान शेअर्सवर दिसून आला.

हेही वाचा – Video: सेलिब्रेशन करताना मार्टिनेझने एमबाप्पेची उडवली खिल्ली; आता होत आहे टीका

मेस्सी जगज्जेता झाला –

अर्जेंटिनाची खास गोष्ट म्हणजे त्यांचा सध्याचा सर्वात मोठा खेळाडू लिओनेल मेस्सी आता वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. मेस्सीचा हा शेवटचा विश्वचषक होता. कारण आता चार वर्षांनंतर विश्वचषक होणार आहे आणि तोपर्यंत लिओनेल मेस्सी वयाची ४० गाठणार आहे.