चार वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या जर्मनीला फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. ई-गटातील सामन्यात जपानने जर्मनीचा २-१ ने धुव्वा उडवला आहे. पहिल्या सत्रात पेनल्टी गोल करत जर्मनीने आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या सत्रात जपानने जोरदार पुनरागमन केलं. जपानने अवघ्या आठ मिनिटांत २ गोल करत विश्वविजेत्या जर्मनीचा २-१ ने पराभव केला.

या विश्वचषकातील हा दुसरा सर्वात मोठा अनपेक्षित विजय ठरला आहे. याआधी मंगळवारी सौदी अरेबियाने दोन वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या अर्जेंटिनाचा २-१ ने पराभव केला होता. यानंतर आज जपानने चार वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या जर्मनीचा पराभव केला आहे. अगदी सुरुवातीपासून जर्मनीचाच विजय होईल, असं सर्वांना वाटत होतं. मात्र, जपानने अभूतपूर्व विजय संपादन केला आहे.

Deepika Kumari in the semi finals of the Archery World Cup sport
दीपिका कुमारी उपांत्य फेरीत; विश्वचषक तिरंदाजीत भारताची चार पदके निश्चित
Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
IPL 2024 Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024: केकेआरविरूद्धच्या मोठ्या पराभवानंतर ऋषभ पंतला ठोठावला २४ लाखांचा दंड, तर इतर खेळाडूंवरही कारवाई
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार

हेही वाचा- FIFA World Cup 2022: मोरोक्कोने गतवेळच्या उपविजेत्या क्रोएशियाला दिली कडवी झुंज, सामना ड्रॉ

सामना सुरू झाल्यानंतर ३३ व्या मिनिटाला गुंडोगॉनने गोल करत जर्मनीला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुढील बराच काळ जर्मनीने आक्रमक खेळी करत बचाव कायम ठेवला. पहिल्या सत्रात पूर्णपणे जर्मनीचं वर्चस्व होतं. दुसऱ्या सत्रातही जर्मनीने आघाडी कायम ठेवली होती. पण सामन्याच्या ७५ व्या मिनिटाला जपानच्या डोअनने पहिला गोल केला आणि जर्मनीशी १-१ अशी बरोबरी साधली. त्यामुळे सामन्याच्या शेवटी चुरस वाढली आणि जर्मनीनेही सावध खेळायला सुरुवात केली.

हेही वाचा- विश्लेषण: ‘आशियातला मॅराडोना’ अशी ओळख असलेला अली करिमी इराणी सरकारसाठी डोकेदुखी का ठरतोय?

पण ८३व्या मिनिटाला जपानच्या असानोने जपानसाठी दुसरा गोल करत विजयी आघाडी घेतली. त्यानंतर जपानने शेवटपर्यंत बचाव कायम ठेवला आणि ऐतिहासिक विजय संपादन केला.