टीम इंडिया टी२० विश्वचषक विजयी होण्याच्या निर्धाराने ऑस्ट्रेलियात दाखल झाला असून पुढील आठवड्यात दोन सराव सामने खेळणार आहे. १७ आणि १९ तारखेला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघांविरुद्ध भारत सराव सामने खेळणार आहे. टी२० विश्वचषक जरी २०२२ पासून सुरु होणार असला तरी भारताचा पहिला सामना हा २३ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. पण, केवळ आयसीसी स्पर्धांमध्येच हे दोन संघ खेळताना दिसतात. हा योग केवळ आशिया चषक आणि आयसीसी स्पर्धांमध्येच जुळून येतो. त्यामुळे उभय संघांमध्ये द्विपक्षीय मालिका केव्हा होणार , असा प्रश्न चाहत्यांपासून ते जगातील सामरिक दृष्ट्या महत्वाचे अस्रणारे देश यांना सुद्धा पडतोय. पण त्याचे उत्तर आता बीसीसीआयने दिले. बीसीसीआयने २०२३-२०२७ पर्यंत भारतीय संघाच्या वेळापत्रकाची रूपरेषा आखली आहे आणि त्यात भारत वि. पाकिस्तान मालिकेला यात स्थान दिले गेलेले नसल्याचे दिसते.

 इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने त्यांच्या राज्य संघटनांना पुढील ४ वर्षांच्या भारतीय संघाच्या वेळापत्रकाची नोंद पाठवली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातल्या मालिकेचा निर्णय बीसीसीआय घेऊ शकत नाही, त्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे. भारत सरकार जोपर्यंत काही सांगत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. मग कुणाची कितीही इच्छा असली तरी देखील त्याला नाईलाज आहे. असे मत बीसीसीआयने व्यक्त केले आहे.

हेही वाचा :  मोठी बातमी: बीसीसीआयची मोठी घोषणा! टी२० विश्वचषकात बुमराहच्या जागी मोहम्मद शमीची निवड 

टीम इंडिया विश्वचषकानंतर न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. यात ३ टी२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारतीय संघ बीसीसीआय केलेल्या स्पष्टीकरणांनुसार २०२७ पर्यंत ३७ कसोटी सामने खेळणार असून त्यातील २० घरी आणि १८ हे भारताबाहेर असणार आहेत. एकदिवसीय आणि टी२० सामन्यांचा विचार केला तर ४२ एकदिवसीय सामने भारत खेळणार असून त्यातील निम्मे भारतात आणि बाकीचे भारताबाहेर असतील. तसेच ६१ टी२० सामन्यांपैकी ३१ घरच्या मैदानावर आणि ३० बाहेर खेळणार आहे.

हेही वाचा :  सय्यद मुश्ताक अली चषकात पृथ्वी शॉ बरसला, फक्त ४६ चेंडूत ठोकले शतक 

वरील आकडेवारीत आयसीसी मालिका सामील नाहीत. २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक, जागतिक अजिंक्य कसोटी चषक आणि चॅम्पियन ट्रॉफीचा ही समावेश नसल्याने ही आकडेवारी कमी झाली आहे. मागील कार्यक्रमात भारताने द्विपक्षीय मालिकेत एकूण १६३ सामने खेळले होते, परंतू २०२३-२७ मध्ये ती संख्या १४१ अशी कमी केली गेली आहे. आयसीसीच्या स्पर्धा असल्यामुळे आणि इंडियन प्रीमिअर लीगचा कार्यकाळ वाढल्यामुळे ही संख्या घटली आहे. बीसीसीआयने चांगल्या संघांविरुद्ध मालिका खेळण्यावर भर दिली आहे. यात इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी, एकदिवसीय व ट्वेंटी-२० मालिका खेळण्यावर भर आहे. भारतीय संघ इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध भारतात आणि भारताबाहेर ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. याशिवाय भारतीय संघ या संघांविरुद्ध ३ एकदिवसीय व ५ टी२० सामन्यांच्या भारतात आणि भारताबाहेर मालिकाही खेळणार आहेत.