ईडेन हझार्ड आणि फर्नाडो टोरेस यांनी दुसऱ्या सत्रात केलेल्या गोलमुळे चेल्सीने हल सिटीचे आव्हान २-० असे परतवून लावत इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. चेल्सीचे २१ सामन्यांत ४६ गुण झाले आहेत. अर्सेनल ४५ गुणांसह दुसऱ्या तर मँचेस्टर सिटी ४४ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. एव्हरटन ४१ गुणांसह चौथ्या क्रमांकावर असून टॉटनहॅमने ४० गुणांसह पाचवे स्थान पटकावले आहे.
हल सिटीने पहिल्या सत्रात दमदार खेळ करत बलाढय़ चेल्सीवर दडपण आणले होते. प्रशिक्षक जोस मॉरिन्हो यांच्या चेल्सी संघाने सुरुवातीला काही चुका केल्या. मात्र चेल्सीने दुसऱ्या सत्रावर पूर्णपणे वर्चस्व गाजवत विजयाची नोंद केली.
५६व्या मिनिटाला हझार्डने चेल्सीसाठी पहिला गोल केला. त्यानंतर तीन मिनिटांनी टोरेसने चेल्सीची आघाडी २-० अशी वाढवली. या गोलसह टोरेसने इंग्लिश प्रीमिअर लीगमधील आपल्या २००व्या सामन्याचा आनंद साजरा केला.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jan 2014 रोजी प्रकाशित
चेल्सीची अव्वल स्थानी झेप
ईडेन हझार्ड आणि फर्नाडो टोरेस यांनी दुसऱ्या सत्रात केलेल्या गोलमुळे चेल्सीने हल सिटीचे आव्हान २-० असे परतवून लावत इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. चेल्सीचे २१ सामन्यांत ४६ गुण झाले आहेत. अर्सेनल ४५ गुणांसह दुसऱ्या तर …

First published on: 12-01-2014 at 06:29 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Football de bruyne set to leave chelsea two unnamed clubs chasing belgian