आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ग्वाटेमाला फुटबॉल महासंघाचे माजी प्रमुख ब्रायन जिमेनेझ यांना स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे.
गैरव्यवहाराबाबत अमेरिकन अन्वेषण विभागाकडून कारवाई सुरू असून जिमेनेझ यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यांनी अटक वॉरंट काढले होते, त्या वेळी ते आजारी होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली नव्हती. अमेरिकन अन्वेषण विभागाने अटक वॉरंट जारी केलेल्या लोकांमध्ये सोळा लॅटिन अमेरिकन संघटकांमध्ये जिमेनेझ यांचा समावेश होता. त्यांनी अनेक अमेरिकन कायद्यांमधील तरतुदींचे उल्लंघन केले असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
ग्वाटेमालाचे माजी सरचिटणीस हेक्टॉर त्रुजिलीओ यांच्यावरही लाचलुचपतीचे आरोप ठेवण्यात आले असून नुकतीच त्यांनाही अटक झाली.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jan 2016 रोजी प्रकाशित
गैरव्यवहारामुळे फुटबॉल अधिकारी अटकेत
अमेरिकन अन्वेषण विभागाकडून कारवाई सुरू असून जिमेनेझ यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते.
First published on: 14-01-2016 at 00:05 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Football officer arrested for fraud