नवी दिल्ली : मॅरेथॉनमधील माजी आशियाई विजेता गोपी थोनाकलने रविवारी अपेक्षितपणे दिल्ली मॅरेथॉन जिंकली. पण, तो पॅरिस ऑलिम्पिक पात्रतेपासून मोठय़ा फरकाने दूरच राहिला.गोपीने २०१७ मध्ये आशियाई मॅरेथॉन जिंकली होती. त्यानंतर आता दिल्ली मॅरेथॉन जिंकताना गोपीने २ तास १४ मिनिटे ४० सेकंद अशी वेळ दिली. मात्र, तो पॅरिस ऑलिम्पिकसाठी निश्चित करण्यात आलेली २ तास ८ मिनिट १० सेकंद ही पात्रता वेळ गाठू शकला नाही.

गोपीने यापूर्वी २०१७ मध्येदेखील ही शर्यत जिंकली होती. त्या वेळेस त्याने २ तास १३ मिनिट ३९ सेकंद ही आपली वयैक्तिक सर्वोत्तम वेळ दिली होती. या दोन्ही विजयात त्याची धाव राष्ट्रीय विक्रमाच्या तुलनेत संथच राहिली. त्यामुळे शिवनाथ सिंहचा १९७८ मध्ये नोंदवलेला २ तास १२ मिनिटाचा राष्ट्रीय विक्रम आबाधित राहिला. तीन वर्षांप्रू्वी विजेतेपद मिळवणारा श्रीनु बुगाथा (२तास १४ मिनिट ४१ सेकंद) दुसऱ्या, तर अक्षय सैनी (२ तास १५ मिनिट २७ सेकंद) तिसऱ्या स्थानावर राहिला.

jyoti surekha vannam
ज्योतीची सुवर्ण हॅट्ट्रिक;  विश्वचषक तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड प्रकारात भारताला पाच पदके
Ekta Day Ranveer Singh wins gold medal in steeplechase sport news
एकता डे , रणवीर सिंहला स्टीपलचेसमध्ये सुवर्ण
Vinesh, Anshu and Reetika earn three Olympic quota places
विनेश, अंशु, रितिकाला ऑलिम्पिक कोटा
Ayesha Khan, Bigg Boss Fame, Cheers For MS Dhoni During
DC Vs CSK: ‘माही’ला चिअर करणारी ही अभिनेत्री चर्चेत, चेन्नईने सामना गमावला तरीही जिंकली मनं

हेही वाचा >>>Ranji Trophy : तामिळनाडूची उपांत्य फेरीत धडक! पुजाराची झुंज अपयशी, आंध्र प्रदेशला विजयासाठी ७५ धावांची गरज

शर्यतीच्या पूर्व संध्येलाच गोपीने पॅरिस ऑलिम्पिकसाठीचा पात्रता निकष गाठणे भारतीय धावपटूच्या आवाक्यात नसल्याचे मत मांडले होते. ते शर्यतीनंतर खरे ठरले. महिला विभागात आश्विनी जाधवने २ तास ५२ मिनिट २५ सेकंद वेळ देताना विजेतेपद पटकावले. निरंबन भारतजी दुसरी, तर दिव्यांका चौधरी तिसरी आली.