सोशल मीडियावर भारतीय खेळाडूंना ट्रोल करणं ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज मिचेल जॉन्सनला चांगलच महागात पडलं आहे. भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज आशिष नेहराला मिचेल जॉन्सनने त्याच्या वय आणि रन-अपवरुन चांगलट ट्रोल केलं. मिचेल जॉन्सन आणि न्यूझीलंडचा गोलंदाज मिचेल मॅक्लेनेघन यांच्यात ट्विटरवर संभाषण सुरु होतं.

मात्र, या संभाषणात ऑस्ट्रेलियाचे ज्येष्ठ खेळाडू डीन जोन्स यांनी उडी घेत आशिष नेहराच्या गोलंदाजीचा संदर्भ दिला.

यावर जॉन्सनने नेहराला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे ट्रोलिंग भारतीय चाहत्यांना फारसं रुचलं नाही. त्यांनीही आकडेवारीचा दाखला देत मिचेल जॉन्सनची चांगलीच धुलाई केली.

यानंतर मिचेल जॉन्सनने आपण ट्विटरवर फक्त मजा-मस्करी करत असल्याचं स्पष्ट केलं, मात्र भारतीय चाहत्यांनी नेहराच्या ट्रोलिंगचा वचपा काढण्याचं ठरवत जॉन्सनला चांगलचं ट्रोल केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेसाठी आशिष नेहराची संघात निवड झाली आहे. मात्र ३८ वर्षाच्या आशिष नेहराला पहिल्या सामन्यात भारतीय संघात जागा मिळाली नव्हती. टी-२० मालिकेसाठी नेहराच्या निवडीवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र टी-२० सामन्यात नेहराचा अनुभव लक्षात घेता भारतीय निवड समितीने नेहराच्या नावाला आपली पसंती दिली होती. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात केल्यानंतर भारतीय संघ उद्या गुवाहाटीच्या मैदानावर दुसरा टी-२० सामना खेळणार आहे. त्यामुळे या सामन्यात आशिष नेहराला संघात जागा मिळते का, हे पहावं लागणार आहे.