चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सलामीवीर ऋतुराज गायकवाडचा पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्या निवडीची जोरदार चर्चा सुरु आहे. आयपीएलच्या कामगिरीच्या जोरावर त्याला कसोटी संघात स्थान मिळाले, असे अनेक दिग्गजांचे म्हणणे आहे, कारण रणजी ट्रॉफीमध्ये सरफराज खानची सर्वोत्तम कामगिरी होती. मात्र, माजी मुख्य निवडकर्ता दिलीप वेंगसरकर यांचे म्हणणे वेगळेच आहे.

विंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा होऊन बरेच दिवस झाले, पण वेगवेगळ्या पैलूंवरील चर्चा आणि वाद थांबण्याचे नाव घेत नाहीत. भारताव्यतिरिक्त पाकिस्तानी खेळाडूंच्याही या निवडीवर प्रतिक्रिया येत आहेत. या निवडीत चार मुद्दे होते, ज्यांनी सर्वाधिक लक्ष वेधले. देशांतर्गत ‘रनवीर’ सरफराज खानची निवड न होणे, चेतेश्वर पुजाराला बाहेर करून अजिंक्य रहाणेला संघाचा उपकर्णधार बनवले आणि चौथा मुद्दा म्हणजे आयपीएलच्या कामगिरीवर ऋतुराज गायकवाडचा संघात समावेश.

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
Axar Patel on Impact Player Rule in IPL 2024
IPL 2024 : अक्षर पटेलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमावर उपस्थित केला प्रश्न, सांगितले ‘या’ खेळाडूंसाठी का आहे धोकायदायक?
ms dhoni thala joined hands being thankful to fan in ekana cricket stadium lsg vs csk ipl 2024 live match
थालाच्या भरमैदानातील ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मने; VIDEO पाहून म्हणाले, “वॉव…”
Ambati Rayudu explains why RCB didn't win a IPL trophy for 16 years
आरसीबीच्या खराब कामगिरीसाठी अंबाती रायुडूने वरिष्ठ खेळाडूंना धरले जबाबदार; म्हणाला, “जेव्हा संघाला गरज असते, तेव्हा…’

माजी भारतीय संघ निवडक दिलीप वेंगसरकर या कल्पनेशी सहमत नाहीत कारण त्यांचा असा विश्वास आहे की “जे खेळाडू पुरेसे चांगले आहेत ते सर्व फॉरमॅटमध्ये जुळवून घेऊ शकतात. ते असेही मानतात की खेळाडू हे कसोटीचे दावेदार आहेत आणि आयपीएलच्या कामगिरीवर त्याला संघात प्राधान्य दिले नाही. ऋतुराज गायकवाडला प्रथमच कसोटी संघात स्थान मिळाले आहे. तो WTC फायनलसाठी राखीव संघाचा भाग होता पण त्याच्या लग्नामुळे त्याने माघार घेतली. त्याने रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि इतर डोमेस्टिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.”

हेही वाचा: WC 2023: नेदरलँड्स-झिम्बाब्वे विरुद्ध पराभव अन् दोनवेळच्या वर्ल्डचॅम्पियनवर क्वालिफायर मधूनच बाहेर पडण्याची येऊ शकते नामुष्की

आता गायकवाडच्या निवडीवर अनेक दिग्गजांनी तीव्र टीका केली आहे, माजी मुख्य निवडकर्ते वेंगसरकर एका वृत्तपत्राशी केलेल्या संभाषणात म्हणाले की, “ते खेळाडूंवर अवलंबून असते कारण, सर्व फॉरमॅटमध्ये दबाव हा सारखाच असतो. कर्नल म्हणून प्रसिद्ध असलेले, वेंगसरकर यांनी टीकाकारांना गायकवाड दीर्घ स्वरूपातील क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत नाही तोपर्यंत टीकाकारांना थांबण्यास सांगितले. आधीच रांगेत असलेल्या सरफराज आणि ईश्वरन यांना पार करून गायकवाड संघात आल्याचे त्यांनी नाकारले आहे.”

चांगल्या खेळाडूंची ‘रांग’ हा शब्द वापरून माजी सलामीवीर जाफरने ट्वीटवर टीका करणाऱ्यांच्या यादीत स्थान मिळवले. विंडीज दौऱ्यासाठी संघ निवडीबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली होती. जाफर म्हणाला होता की, “ईश्वरन आणि पांचाल रणजी ट्रॉफी आणि इंडिया ‘अ’ साठी चांगली कामगिरी करत आहेत. हे खेळाडू अनेक दिवसांपासून कसोटी संघाचे दरवाजे ठोठावत आहेत. आता हे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत नाहीत, मग ही बाब समजण्याच्या पलीकडची आहे. तसेच, गायकवाडने संघात स्थान मिळवण्यासाठी या रांगेत कशी उडी घेतली? हा ही एक प्रश्न आहे.”

हेही वाचा: World Cup Trophy: वर्ल्डकप ट्रॉफी पोहोचली थेट अंतराळात! पृथ्वीपासून तब्बल १.२० लाख फूट उंचीवर… , Video व्हायरल

जाफरच्या टीकेवर वेंगसरकर यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, “लाल चेंडू आणि पांढरा चेंडू यात काही फरक पडत नाही. कसोटी क्रिकेट, वन डे आणि टी२० हे सर्व समान आहेत.” ते पुढे म्हणाले की, एक चांगला खेळाडू सर्व फॉरमॅटमध्ये स्वत:ला अॅडजस्ट करतो. गायकवाड कसोटी क्रिकेटमध्ये कशी कामगिरी करतात हे पाहावे लागेल. मात्र, मला विचित्र गोष्ट समजत नाही प्रत्येक खेळाडू स्पर्धेत असतो म्हणजे काय? गायकवाडने भारतासाठी झटपट क्रिकेटमध्ये कारकिर्दीची सुरुवात केली आहे, परंतु टी२० मध्ये अर्धशतक होऊनही त्याला अद्याप संघात स्थान मिळालेले नाही. त्याच वेळी, यशस्वी जैस्वालने अद्याप भारतासाठी आपल्या कारकिर्दीची सुरुवातही केलेली नाही. मग नक्की रांगेत कोण?” असा सवाल त्यांनी जाफरला केला.