लंडन : दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील इंग्लंडचे सर्वोत्तम फिरकी गोलंदाज डेरेक अंडरवूड यांचे सोमवारी केंट येथे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या अंडरवूड यांनी अचूक गोलंदाजीच्या जोरावर ६० आणि ७०च्या दशकांत आपला दबदबा राखला होता. अंडरवूड इंग्लंडकडून सर्वाधिक गडी बाद करणारे फिरकी गोलंदाज होते. त्यांनी ८६ कसोटींत २९७ गडी बाद केले. तब्बल २४ वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या अंडरवूड यांनी या कालावधीत २,४६५ गडी बाद केले.

अंडरवूड यांची आकडेवारी हा एक भाग झाला. मैदानावरील सर्वोत्तम क्षणांमध्ये १९७७ मधील भारताविरुद्धची मालिका विसरता येणार नाही. त्या वेळी पाच सामन्यांच्या मालिकेत अंडरवूड यांनी २९ गडी बाद करताना भारताला ३-१ असे पराभूत केले होते. तेव्हा सर्वोत्तम फलंदाज असलेल्या सुनील गावसकर यांनीही अंडरवूड यांच्या गोलंदाजीचा जणू धसका घेतला होता. तेव्हा चार दशकांपूर्वीच्या इंग्लंडचा आणखी एक धूर्त डावखुरा फिरकी गोलंदाज हेडली व्हेरिटीची आठवण इंग्लंड क्रिकेटला झाली. डग्लस जार्डिनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने १९३३-३४ मध्ये पहिला मालिका विजय मिळवला. तेव्हा तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत हेडलींनी २४ गडी बाद केले होते. हेडली व्हेरिटींचा हाच वारसा चार दशकांनी अंडरवूड यांनी वेगवान गोलंदाज जॉन लीव्हरच्या साथीत आबाधित ठेवला होता. गोलंदाजीतील अचूकतेमुळे अंडरवूड क्रिकेट वर्तुळात ‘डेडली’  या टोपणनावाने परिचीत होते.

kolkata knight riders faces sunrisers hyderabad in ipl 2024 qualifier 1
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: ‘क्वॉलिफायर१’च्या सामन्यात आज कोलकातासमोर हैदराबादचे आव्हान, अंतिम फेरीचे लक्ष्य!
ipl 2024 livingstone returns to england
गुडघ्याच्या दुखापतीमुळे लिव्हिंगस्टोन मायदेशी ; बटलर, जॅक्स, टॉपलीही इंग्लंडला परत
rohit needs rest due to exhaustion from playing cricket continuously opinion of michael clarke
रोहितला विश्रांतीची गरज! सातत्याने क्रिकेट खेळून दमल्याने फलंदाजीवर परिणाम; मायकल क्लार्कचे मत
Worcestershire cricketer Josh Baker who died at the age of 20
Josh Baker : क्रिकेट विश्वावर शोककळा, ‘या’ खेळाडूने वयाच्या २० व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
Richard Gleeson debuts in IPL
Richard Gleeson : पर्दापणाच्या सामन्यात रोहित, विराट आणि ऋषभला बाद करणारा शिलेदार आता धोनीसेनेत
Jason Gillespie Gary Kirsten
कर्स्टन, गिलेस्पी पाकिस्तानचे नवे प्रशिक्षक
Virat Kohli 1st Indian player to reach 500 runs for 7th time in IPL history
GT vs RCB : विराट कोहलीने रचला इतिहास, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Shahrukh khan statement after match
IPL 2024 : ‘सामन्याआधी मला कळलं मी ४ नंबरवर फलंदाजीला उतरणार, पण…’, पहिल्या अर्धशतकानंतर शाहरूख खान काय म्हणाला?

हेही वाचा >>> ऑलिम्पिक सोहळा पुन्हा स्टेडियममध्ये? सुरक्षेचा धोका असल्याची फ्रान्सच्या अध्यक्षांना भीती

गावस्कर ऐन भरात असलेल्या काळात अंडरवूड यांनी भारतीय फलंदाजांवर वर्चस्व राखण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे दाखले आजही दिले जातात. इम्रान खान आणि मायकल होिल्डग या वेगवान गोलंदाजांनी ऐन भरात असताना कसोटीत गावस्कर यांना ११ वेळा बाद केले. पण, अंडरवूडने या सर्वांवर कडी करताना तब्बल १२ वेळा गावस्कर यांना आपली शिकार बनवले. तो कमालीचा झटपट चेंडू टाकायचा. वेगवान गोलंदाज आग ओकत असतानादेखील मला अंडरवूडची गोलंदाजी खेळणे कठीण गेले असे गावस्कर यांनीदेखील मान्य केले होते. अंडरवूड यांनी भारताविरुद्ध खेळताना २० कसोटी ६२ बळी मिळवले. अंडरवूड हे तळातल्या फळीत फलंदाजी करायचे. त्यांची फलंदाजी किरकोळ होती. पण, अनेकदा रात्रप्रहरी (नाइट वॉचमन) म्हणून येताना त्यांनी वेगवान गोलंदाजांचा समर्थपणे सामना केल्याची उदाहरणे आहेत. पुढे वादग्रस्त केरी पॅकर्सच्या काळात अंडरवूड यांनी कारकीर्दीमधील दोन वर्षे वाया घालवली. नंतर १९८१ मध्ये बंडखोर इंग्लंड संघासोबत दक्षिण आफ्रिका दौरा केल्याने त्यांच्यावर बंदीदेखील आणण्यात आली होती. निवृत्त झाल्यावर अंडरवूड एक यशस्वी व्यावसायिकही बनले. अर्थात, हा व्यवसायही क्रिकेटचाच होता. त्यांनी कृत्रिम खेळपट्टी (रोल-इन) बनविण्याच्या व्यवसायात चांगला जम बसवला होता. मेरिलिबोन क्रिकेट क्लबचे ते २००८ मध्ये अध्यक्षही राहिले होते. आज क्रिकेट खूप बदलले असले, तरी जुन्या पिढीतल्या क्रिकेटपटू त्यांच्या हातातील जादू कधी विसरणार नाहीत.