पॅरिस : पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सीन नदीवर आयोजित आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा स्टेडियममध्ये स्थानांतरित केला जाऊ शकतो, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉं यांनी सोमवारी सांगितले.

पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकच्या स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी देशांच्या खेळाडूंसह लाखो क्रीडाप्रेमी फ्रान्सला भेट देण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये उच्चस्तरीय सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी फ्रान्सने अन्य देशांकडूनही सुरक्षासेवा मिळण्याची विनंती यापूर्वीच केली आहे.

Former England star spinner Derek Underwood passes away
इंग्लंडचे फिरकी गोलंदाज डेरेक अंडरवूड यांचे निधन
Rohit Sharma Rahul Dravid and Ajit Agarkar Meeting about Hardik Pandya in T20 WC
Hardik Pandya: रोहित, द्रविड, अजित आगरकर यांची BCCI मुख्यालयात दोन तास बैठक; हार्दिक पांड्याबाबत सविस्तर चर्चा, नेमकं ठरलं काय?
candidates chess 2024 vidit gujrathi beats nakamura
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय, गुकेशची प्रज्ञानंदशी बरोबरी; नेपोम्नियाशीसह संयुक्त आघाडीवर
Pranab Mukherjee and P Chidambram
‘RBI बँक सरकारची चीअर लीडर’, माजी गव्हर्नरकडून युपीए सरकारवर खळबळजनक आरोप

या वेळचा उद्घाटन सोहळा अभूतपूर्व करण्यासाठी फ्रान्सने सीन नदीवर या सोहळयाचे आयोजन निश्चित केले आहे. यामध्ये बोटीवरून ६ कि.मी. अंतराचे खेळाडूंचे संचलन होणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी नदीच्या दोन्ही तटबंदीवर मोठया प्रमाणावर गर्दी अपेक्षित धरण्यात आली आहे. ‘‘खेळाडू आणि पाहुण्यांची सुरक्षाव्यवस्था आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. यामध्ये कुठलीही कसर सोडण्यात येणार नाही. पण, जर आम्हाला यामध्ये धोका वाटला तर, आम्ही हा सोहळा स्टेडियममध्ये घेण्याचीही तयारी ठेवली आहे,’’ असे मॅक्रॉं म्हणाले.

‘‘स्टेडियमबाहेर नदीवर होणारा उद्घाटन सोहळा हे या ऑलिम्पिकचे वैशिष्टय ठरणार आहे. आम्ही तेच पूर्ण करण्यासाठी आग्रही आहोत. पण, नैसर्गिक आपत्तीचे आपल्या हातात नाही. त्यामुळे आम्ही यासाठी आमच्या योजना तयार ठेवल्या आहेत. अर्थात अंतिम निर्णय घेतलेला नाही,’’ असेही मॅक्रॉं यांनी सांगितले.

हेही वाचा >>> IPL 2024 RCB vs SRH : धावांचा महापूर सुफळ संपूर्ण; दिनेश कार्तिकची झुंज व्यर्थ

या सोहळयासाठी सुरुवातीला ६ लाख प्रेक्षकांची उपस्थिती निश्चित करण्यात आली होती. हे सर्व लोक हा सोहळा विनामूल्य पाहणार होते. पुढे हा आकडा ३ लाखांपर्यंत कमी करण्यात आला आणि प्रेक्षकांसाठी माफक दरांची तिकिटेही ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. विनामूल्य तिकिटे केवळ निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. शांतता आणि एकीचे प्रतीक असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धाचा इतिहास लक्षात घेता पॅरिस ऑलिम्पिकच्या माध्यमातून युद्धविरामासाठी प्रयत्न केले जावेत अशी फ्रान्स अध्यक्ष मॅक्रॉं यांची इच्छा आहे. युक्रेनमधील रशियाचे युद्ध तिसऱ्या वर्षांत आहे. मध्य पूर्वेकडीलही संघर्ष विकोपाला गेले आहेत. सुदानमधील परिस्थिती सर्वात भीषण आहे. मॅक्रॉं म्हणाले,‘‘आम्हाला युद्धविरामाच्या दिशेने काम करायचे आहे. यासाठी सर्व भागीदारांना बरोबर घेऊन काम करण्याची मला एक संधी मिळणार आहे.’’

मॅक्रॉं यांनी या वेळी ऑलिम्पिक ध्वजाखाली रशियन खेळाडूंच्या सहभागाच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच गाझामध्ये पॅलेस्टिनींची हत्या होत असताना आणि मोठया संख्येने विस्थापितांची संख्या वाढत असूनही इस्रायली खेळाडूंना त्यांच्या राष्ट्रीय ध्वजाखाली खेळण्याची मान्यता देण्याच्या निर्णयालाही त्यांना पाठिंबा दिला. या दोन्ही समर्थनाची पाठराखण करताना मॅक्रॉं म्हणाले,‘‘रशियाने हल्ले केले आहेत. इस्रायलने हल्ले केलेले नाहीत. इस्रायल हा देश दहशतवादी हल्ल्याचा बळी पडला आहे.’’

ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जांभळया रंगाचा ट्रॅक

ऑलिम्पिक स्पर्धेचे आकर्षण असलेल्या अ‍ॅथलेटिक्सच्या शर्यती या आतापर्यंत लाल मातीच्या रंगाने निर्माण केलेल्या सिंथेटिकच्या ट्रॅकवर पार पडतात. पण, पॅरिस ऑलिम्पिक याला अपवाद असेल. या वेळी ऑलिम्पिकमध्ये ट्रॅकचा रंग जांभळा ठेवण्यात आला आहे. हा सिथेंटिक ट्रॅक इटलीतील एका कारखान्यात तयार करण्यात आला असून, कारखान्यातील कामगार जातीने लक्ष देऊन हा ट्रॅक मुख्य मैदानावर बसवण्याचे काम करत आहेत. तीन वर्षांपूर्वी झालेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तीन विश्वविक्रम आणि १२ ऑलिम्पिक विक्रम नोंदवण्यात आले. या वेळचा जांभळा ट्रॅक वेगवान असेल आणि त्यावर अधिक विक्रम नोंदविण्यासाठी धावपटू उत्सुक राहतील असे सांगण्यात येत आहे. मॉन्डो ही कंपनी १९७६ मॉन्ट्रियल ऑलिम्पिकपासून प्रत्येक उन्हाळी ऑलिम्पिकसाठी ट्रॅक बनवून देत आहे आणि ही प्रथा पॅरिसमध्येही कायम राहिली आहे. डेकॅथलॉन प्रकारातील माजी ऑलिम्पियन ब्लोंडेल म्हणाले,‘‘हा अतिशय चांगला ट्रॅक आहे. फ्रान्स ऑलिम्पिकसाठी निळा, हिरवा असे काही रंग निश्चित केले आहेत. त्यातील जांभळा हा एक रंग आहे. ’’