Shoaib Malik Prediction on IND vs AUS Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया १९ नोव्हेंबर रोजी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. गुरुवारी ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत आटव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. तत्पूर्वी बुधवारी न्यूझीलंडला हरवून भारतीय संघाने चौथ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यापूर्वी अनेक माजी क्रिकेटपटू कोण विश्वविजेता ठरेल याबाबत भाकीत करत आहेत. अशात पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने विश्वचषक विजेत्या संघाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषक विजेता ठरेल – शोएब मलिक

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ ए स्पोर्ट्स चॅनलच्या एका कार्यक्रमातील आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू शोएब मलिक याने ए स्पोर्ट्स चॅनलच्या एका कार्यक्रमात बोलताना विश्वचषक २०२३ चे विजेतेपद जिंकणाऱ्या संघाचे नाव सांगितले. तो म्हणाला की ऑस्ट्रेलियन संघ ज्या पद्धतीने मोठ्या सामन्यांमध्ये खेळतो, त्यामुळे पुन्हा एकदा वरचढ ठरून विश्वचषक जिंकू शकतो. शोएब मलिकला आपले भाकीत वर्तवण्यासाठी सांगितले असता, तो म्हणाला, ‘ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषक विजेता ठरेल.’

एकदिवसीय विश्वचषक २०२३ बद्दल बोलायचे झाले, तर भारतीय संघ आतापर्यंत एकही सामना हरलेला नाही. साखळी टप्प्यातील नऊ सामने जिंकल्यानंतर संघाने उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. टीम इंडियाने साखळी फेरीतही ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. ऑस्ट्रेलियन संघाने २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर शानदार पुनरागमन केले, तेव्हापासून संघाने सलग आठ सामने जिंकले आहेत.

हेही वाचा – IND vs AUS Final पाहण्यासाठी पीएम मोदी येऊ शकतात, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि एमएस धोनीलाही निमंत्रण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. यापूर्वी २००३ साली ऑस्ट्रेलियाने भारताला अंतिम फेरीत पराभूत केले होते. २० वर्षांनंतर टीम इंडियाचा पुन्हा एकदा सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे, अशा परिस्थितीत टीम इंडियालाही विजेतेपद जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. अहमदाबादमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने दोन सामने जिंकले आहेत आणि ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकला आहे.