ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा आक्रमक आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नर त्याच्या संघाचा कर्णधार होण्यासाठी प्रबळ दावेदार होता. पण दक्षिण ऑस्ट्रेलियाने वॉर्नरवर पक्षपाती पूर्व पुनरावलोकन आरोप केला होता. त्यानंतर त्याच्या कर्णधार होण्याच्या सर्व आशा संपल्या आहेत. वॉर्नरच्या लीडरशिप बॅन प्रकरणी सर्वांनी आपापले मत मांडले आहे. दरम्यान, माजी फलंदाज मायकल क्लार्कने वॉर्नरच्या समर्थनार्थ मोठं वक्तव्य केलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज मायकल क्लार्कने ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर टीका करताना वॉर्नरचे समर्थन केले आहे. त्याने म्हटले आहे की, “डेव्हिड वॉर्नर खूप निराश आणि दु:खीही आहे. मात्र, स्टीव्ह स्मिथकडे कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोपवले जात असल्याने त्याची निराशा झाली आहे. मी वॉर्नरची निराशा आणि दुःख दोन्ही समजू शकतो. ऑस्ट्रेलियन बोर्डाचा दृष्टिकोन त्याच्याबाबत योग्य नाही.”

क्लार्क पुढे म्हणाला, “एका खेळाडूसाठी वेगळे नियम आणि दुसऱ्या खेळाडूसाठी वेगळे नियम, यावर विश्वास ठेवणे अजिबात योग्य नाही. मात्र, बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर कोणत्याही खेळाडूला कर्णधारपदापासून दूर ठेवणे योग्य ठरेल, असे ऑस्ट्रेलिया बोर्डाला वाटत असेल.”

हेही वाचा – PAK vs ENG Test Series: दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम हॉटेलजवळ गोळीबार, पुन्हा जाग्या झाल्या ‘त्या’ आठवणी

तो पुढे वॉर्नरच्या समर्थनार्थ म्हणाला की, ”जर स्मिथकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते आणि वॉर्नरवर अजूनही बंदी आहे. त्याचबरोबर कॅमेरून बॅनक्रॉफ्टलाही संधी मिळू शकते. मग डेव्हिड वॉर्नरला का नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलिया वॉर्नरला बळीचा बकरा बनवत आहे. वॉर्नरवर जेव्हापासून नेतृत्वाची बंदी घालण्यात आली आहे, तेव्हापासून तो या प्रकरणाने खूप चर्चेत आहे.”

हेही वाचा – IND vs BAN Test Series: पहिल्या कसोटी सामन्यासाठी बांगलादेशचा १७ सदस्यीय संघ जाहीर; ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्व

अलीकडेच सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनेही सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, ”माझे क्रिकेट माझ्या कुटुंबापेक्षा महत्त्वाचे नाही आणि पुन्हा त्याला आणि त्याच्या कुटुंबाला या प्रकरणात ओढू नये.” तसेच पुढील १२ महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे संकेतही त्याने दिले आहेत.