सध्या इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने ७४ धावांनी जिंकला आहे. त्याचबरोबर मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम हॉटेलजवळच्यी परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

पाकिस्तानमध्ये सुरक्षा हा नेहमीच मोठा मुद्दा राहिला आहे, पण श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक बड्या देशांनी तिथले दौरे थांबवले आहेत. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानमध्ये मालिका खेळण्यासाठी संघ परतत आहेत. सध्या इंग्लंड क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये आहे. दुसरा सामना मुलतान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. टीम हॉटेलजवळ गुरुवारी गँगवार झाले.

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड दुसरी कसोटी वेळापत्रकानुसार होणार –

रिपोर्टनुसार, दोन टोळ्यांमध्ये गोळीबार झाला, ही घटना पाकिस्तान आणि इंग्लंड संघापासून फक्त एक किलोमीटर अंतरावर होती. पाकिस्तान पोलिसांनी याप्रकरणी आरोपींचा शोध सुरू केला आहे. आता मिळालेल्या वृत्तानुसार, मुलतानमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. नियोजित वेळापत्रक आणि वेळेनुसार सामना सुरू होईल.

यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेट संघ पाकिस्तानात आल्यानंतर एकही सामना न खेळता परतला होता. त्यावेळी न्यूझीलंड क्रिकेट संघाला ईमेलद्वारे धमक्या मिळाल्या होत्या, हल्ल्याचा कट असल्याच्या संशयामुळे, न्यूझीलंडने परत जाणे चांगले मानले. त्यावेळी पाकिस्तानचे खूप नुकसान झाले होते, त्याच्या वाईट प्रतिमेवर आणखी एक डाग लागला होता.

हेही वाचा – IND vs BAN Test Series: पहिल्या कसोटी सामन्यासाठी बांगलादेशचा १७ सदस्यीय संघ जाहीर; ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्व

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मालिकेबद्दल बोलायचे झाले, तर पहिली कसोटी इंग्लंडने ७४ धावांनी जिंकली. इंग्लंडने पहिल्या डावात ६५७ धावा केल्या, तर पाकिस्तानने पहिल्या डावात ५७९ धावा केल्या. इंग्लंडने आपला दुसरा डाव २६४ धावांवर घोषित केला, प्रत्युत्तरात पाकिस्तान दुसऱ्या डावात २६८ धावांत आटोपला. इंग्लंडने ७४ धावांनी विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. दुसरी कसोटी जिंकून इंग्लंडला ही मालिका जिंकायची आहे.