Gautam Gambhir hits back at Ricky Ponting over comments on Virat Kohli and Rohit Sharma: भारतीय संघाची एक तुकडी २२ नोव्हेंबरपासून होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. यादरम्यानच भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत गंभीरने भारतीय क्रिकेट संघाबाबतच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडविरूद्ध कसोटीतील रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या फॉर्मबाबत अनेकांनी मोठी वक्तव्य केली आहेत. यात रिकी पॉन्टिंगच्या वक्तव्यावर गंभीरने त्याला चांगलंच सुनावलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंगने अलीकडेच विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली होती. ३६ वर्षीय विराट सध्या कठीण टप्प्यातून जात आहे, त्याने २०१९ पासून केवळ दोन कसोटी शतकं झळकावली आहेत. पॉन्टिंग पुढे म्हणाला की अशी आकडेवारी असलेल्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला संघातून वगळण्यात आले असते.

हेही वाचा – भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर

u

विराट कोहलीबाबत काय म्हणाला होता रिकी पॉन्टिंग?

आयसीसी रिव्ह्यू एपिसोडमध्ये बोलताना पॉन्टिंग म्हणाला, “मी नुकतीच विराटची आकडेवारी पाहिली, त्यात असे दिसले आहे की गेल्या पाच वर्षांत त्याने फक्त दोन ते तीन कसोटी शतके झळकावली आहेत. ते मला योग्य वाटलं नाही. पण जर ते खरे असेल, तर ही चिंतेची बाब आहे. पाच वर्षांत केवळ दोन कसोटी सामन्यात शतकं झळकावणारा टॉप ऑर्डरमधील फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा कदाचित दुसरा कोणी नसेल.”

हेही वाचा – Suryakumar Yadav : कर्णधार सूर्यकुमार यादवची ‘ती’ चूक टीम इंडियाला पडली महागात, यजमानांनी भारताच्या तोंडचा घास हिरावला

गौतम गंभीर रिकी पॉन्टिंगच्या वक्तव्याबाबत म्हणाला, “पॉन्टिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? मला वाटतं त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा विचार करायला हवा आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याला विराट आणि रोहितची चिंता नसावी. ते दोघेही एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. भारतीय क्रिकेटसाठी त्यांनी खूप काही साध्य केलं आहे आणि भविष्यातही ते कायम साध्य करत राहतील. मला वाटतं, माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते अजूनही खूप कठोर परिश्रम करतात आणि ते अजूनही उत्कट आहेत, त्यांना अजून खूप काही साध्य करायचे आहे आणि ते खूप महत्वाचे आहे. त्या ड्रेसिंग रूममधील सामना जिंकण्याची, कामगिरी करत राहण्याची भूक माझ्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. विशेषत: गेल्या मालिकेत जे घडले त्या नंतर सर्वांमध्येच विजयाची आणि चांगल्या कामगिरीची भूक आहे.”

Story img Loader