रोहित शर्माची नुकतीच भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संघाचा माजी कर्णधार असलेल्या विराट कोहलीला आयसीसी स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळत नव्हते, त्यानंतर कामाचा ताण कमी करण्यासाठी त्याने पायउतार होण्याचा निर्णय घेतला. दिग्गज क्रीडापंडित अनेकदा रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील चांगल्या कर्णधाराची निवड करतात. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनेही आपले मत मांडले आहे.

विराट आणि रोहितच्या कर्णधारपदावर गौतम गंभीरने मोठे वक्तव्य केले आहे. टाइम्स नाऊशी बोलताना गंभीर म्हणाला, ”रोहित शर्माने नुकतीच टी-२० कर्णधारपदाची सुरुवात केली आहे, त्यामुळे तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. रोहितने आयपीएलमध्ये ५ विजेतेपदे जिंकली आहेत, त्यामुळे त्याने काहीतरी चांगले केले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये तुम्हाला काही वेळा एक पाऊल पुढे असायला हवे. तुम्ही सामना हाताबाहेर जाऊ देऊ शकत नाही. रोहित कधीही सामना आपल्या हातातून निसटू देत नाही. त्याच्या खेळात आक्रमकता दिसून येते.”

chavadi lok sabha election 2024 maharashtra political crisis
चावडी : जागा चार आणि आश्वासने भारंभार !
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
Hardik Emotional After Third Defeat
MI vs RR : ‘आम्ही लढत राहू आणि पुढे…’, सलग तिसऱ्या पराभवानंतर हार्दिक पंड्याची भावनिक पोस्ट व्हायरल

हेही वाचा – ३० जुलै २०२०..! क्रिकेटर हार्दिक पंड्यानं हातावर काढला ‘नवा’ Tattoo; या तारखेमागचं रहस्य ऐकाल तर…

रोहितने विराट कोहलीपेक्षा जास्त यश मिळवले आहे, त्यामुळे रोहित थोडा चांगला कर्णधार होऊ शकतो, असे गंभीरचे मत आहे. रोहितचे कौतुक करताना गंभीर पुढे म्हणाला, ”जेव्हा तुम्ही या स्तरावर क्रिकेट खेळता, तेव्हा अधिक असुरक्षितता असते. तुम्ही जितकी जास्त काळजी घ्याल, तितकी तुम्ही चांगली कामगिरी करू शकाल. मला खात्री आहे की ज्याप्रकारे रोहित शर्माला खूप पाठिंबा मिळाला आहे, तो तरुण खेळाडूंनाही तेवढाच पाठिंबा देईल.”

टी-२० विश्वचषक संपल्यानंतर भारताच्या रोहितला भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद मिळाले आहे. रोहितने काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत आपले कौशल्य दाखवले होते. रोहितच्या नेतृत्वाखाली या संघाने ३ सामन्यांची मालिका ३-० ने जिंकली. कायमस्वरूपी प्रशिक्षक झाल्यानंतर राहुल द्रविडची ही पहिलीच मालिका होती. यासह, आता रोहित आणि द्रविडकडून अशी अपेक्षा आहे, की हे दोघेही २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात भारताला विजय मिळवून देतील.