क्वालालंपूर : गेल्या सामन्यात नेदरलँड्सवर दिमाखदार विजय मिळवणाऱ्या भारताच्या कनिष्ठ हॉकी संघाला उपांत्य सामन्यात आपली लय कायम राखता आली नाही व एकतर्फी झालेल्या सामन्यात जर्मनीकडून १-४ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिसऱ्यांदा कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेचे जेतेपद मिळवण्याचे भारताचे स्वप्न अधुरेच राहिले.

उपांत्यपूर्व सामन्यात दोन गोलच्या पिछाडीनंतर पुनरागमन करणाऱ्या भारताकडे जर्मनीचा भक्कम बचाव व मजबूत आक्रमण यांचे उत्तर नव्हते. तसेच पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात आलेले अपयशही भारताला महागात पडले. भारताला या सामन्यात १२ पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण यापैकी एकावरही गोल करता आला नाही.  

Shreyanka Patil Finger Fractured
Team India : आशिया कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, ‘मॅच विनर’ खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर
euro 24 england vs netherlands match prediction
इंग्लंडला कामगिरीत सुधारणेची आस; आज नेदरलँड्सविरुद्ध उपांत्य लढत; प्रमुख खेळाडू चमकण्याची गरज
Zimbabwe beat India by 13 runs in 1st T20 Match
झिम्बाब्वेची विजयी सलामी! विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची ‘यंग ब्रिगेड’ पहिल्याच सामन्यात ठरली अपयशी
Twenty20 World Cup winning Indian team welcomed in Mumbai
ट्वेन्टी२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे दिमाखात स्वागत
Rohit Sharma's Flying Kiss Video Viral After India's Defeat of England
IND vs ENG : आधी संघाला विजयी केले, मग जिंकले रितिकाचे मन, मैदानावर दिसले रोहित शर्माचे नवे रुप, पाहा VIDEO
Three important turning points in India's victory
IND vs ENG : रोहित-सूर्याची फलंदाजी, अक्षर-कुलदीपची फिरकी, ‘या’ तीन टर्निंग पॉइंट्समुळे भारताने इंग्लंडवर केली मात
T20 World Cup 2024 India vs England Semi Final 2 Match Preview in Marathi
IND vs ENG Semi Final 2 : पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणत्या संघाला होणार फायदा?
Rohit Sharma
“ऑस्ट्रेलियाचा संघ आता…”. रोहित शर्माने एका वाक्यात व्याजासकट बदला घेतला; हिटमॅन स्टाईल उत्तराचा VIDEO व्हायरल

हेही वाचा >>> लंदाजांमुळे भारताचे वर्चस्व! इंग्लंड महिला संघाविरुद्ध एकमेव कसोटीच्या पहिल्या दिवशीच चारशे पार; चौघींची अर्धशतके

जर्मनीने चारही सत्रांत एकेक गोल केला, तर भारताकडून एकमेव गोल चिरमाको सुदीपने ११व्या मिनिटाला केला. जर्मनीकडून लिये हेसबाकने आठव्या मिनिटाला व ३०व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केले. ग्लेंडर पॉलने (४१व्या मि.) पेनल्टी कॉर्नरवर गोल झळकावला. स्पर्लिग फ्लोरियनने सामना संपण्याच्या दोन मिनिटाआधी मैदानी गोल करत संघाला ४-१ असे आघाडीवर नेले. आता भारताचा कांस्यपदकासाठी सामना होईल. भारताने २००१मध्ये होबार्ट व २०१६मध्ये लखनऊ येथे झालेल्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकल्या होत्या. याशिवाय १९९७मध्ये इंग्लंडच्या मिल्टन किन्स येथे झालेल्या स्पर्धेत भारत उपविजेता होता. दोन वर्षांपूर्वी भुवनेश्वर येथे झालेल्या स्पर्धेत भारताला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. त्यावेळीही भारताला जर्मनीने ४-२ असे नमवले होते. तसेच जोहोर चषकाच्या उपांत्य सामन्यातही भारताला जर्मनीकडून ३-६ असा पराभव पत्करावा लागला होता. भारताला जर्मनीविरुद्ध वारंवार अपयश येत आहे. या वर्षी जर्मनीने पाचपैकी पाच सामन्यांत भारताला नमवले आहे.