भारतीय महिला टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सध्या इंग्लंडमध्ये स्थानिक Kia Super League स्पर्धेत खेळते आहे. लँकशायर थंडर संघाकडून खेळणाऱ्या हरमनप्रीतने आपल्या धडाकेबाज खेळीने सर्वांचीच मनं जिंकून घेतली आहेत. यॉर्कशायर डायमंड्स संघाविरुद्ध खेळताना हरमनप्रीतने ७४ धावांची खेळी केली. या खेळीत ६ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता.

यातील एक षटकार हरमनप्रीतच्या कायम आठवणीत राहणार आहे. हरमनप्रीतच्या एका षटकाराने मैदानाबाहेरील एका गाडीची काच फुटली आहे. सोशल मीडियावर सध्या या फुटलेल्या काचेचा फोटो चांगलाच व्हायरल होतो आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच सामन्यात हरमनप्रीतचा एक फटका स्टेडीयममध्ये बसलेल्या पत्रकाराला लागता लागता राहिला आहे. या फटक्यानंतर हा पत्रकार काहीकाळासाठी भांबवलेला दिसत होता. हरमनप्रीतने केलेल्या खेळीच्या जोरावर लँकशायर संघाने १५४/९ या धावसंख्येपर्यंत मजल मारली. या स्पर्धेतलं हरमनप्रीत कौरचं हे पहिलं अर्धशतक ठरलं आहे. यॉर्कशायर संघाला लँकशायरने दिलेलं आव्हान पेलवता आलं नाही. लँकशायरने हा सामना ९ धावांनी जिंकला.